सर्वोच्च शिखर महाराष्ट्रातील "कळसुबाई "
वर्ष २०१६ आणि नवं वर्षातला जानेवारी महिना. प्रत्येक जण नव वर्ष आले की "New Year Resolution” बनवतात आणि नव्या वर्षाची सुरवात एकदम दणक्यात सुरुवात करतात. असेच काही "New Year Resolution" दुर्गविहार ने ठरवले. प्रश्न पडला कुठून सुरवात करायची? नवं वर्षाची सुरवात अशी काही करू की ती वर्षा अखेरपर्यंत व पुढील अनेक वर्षापर्यंत स्मरणार्थ राहील. मग मनात आले एक शिखर जे महाराष्ट्रातील एक उंच व सर्वोत्तम शिखर म्हणून ओळखले जाते. ते शिखर म्हणजे- "कळसुबाई”. कळसुबाई शिखराचे दर्शन आपल्याला बारी या एका छोट्याश्या कसब्या कडून होते, हे गाव भंडारदरा पासून साधारणपणे ६ कि.मी इतक्या अंतरावर आहे. इथे आपण मुंबई-नाशिक हायवे घेऊन-वाया इगतपुरी मार्गे जाऊ शकतो.
जानेवारीतल्या १६-१७ तारखेला दुर्गविहार तर्फे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या “कळसुबाई” येथे ट्रेक आयोजित केला होता. माझा दुर्गविहार बरोबरचा हा साधारणपणे २२वा ट्रेक आणि volunteer म्हणून ३रा ट्रेक. या वेळी "Meeting point" पनवेल आणि कल्याण ठरले होते आणि विशेष म्हणजे,ट्रेकर्सची संख्या जास्त असल्यामुळे २ private बस केल्या होत्या.या वेळी जवळ पास ५९ ट्रेकर्स ची संख्या होती. रोज प्रमाणे मी ठाकुर्ली हून रात्री ११ च्या सुमारात लोकल पकडून कल्याण स्टेशनला जायला निघालो. कळसुबाई ट्रेक पहिलाच असल्यामुळे मनात शिखर चढण्याची खूप उत्सुकता होती. ट्रेकसाठी नेमले गेलेले Group Volunteer व Group Leader दिव्या- अर्चना ने आपल्या कडे असलेल्या ट्रेक मेम्बरची यादी काढली आणि सगळ्यानची हजेरी घेतली व काही प्रोटोकॉल्सवर उजेड टाकला.
मध्यरात्री १ चा सुमारात कळसुबाई ट्रेकची सुरुवात करण्यात आली. श्रीफळफोडून व गणपती बाप्पा मोरया चा गजरात बस मुंबई-नाशिक हायवेच्या दिशेने निघाली. पहाटे ३.३० - ४ चा सुमारात बस कळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या बारी या एका छोट्याश्या कसब्या पाशी येउन पोहोचली. चांदण्या रात्री आणि गुलाबी थंडीत कुड-कुडत काही ट्रेकर्स झोपी गेले व आम्ही काही ट्रेकर्स Slow Shutter Speed with low light Effect Photography चा आनंद लुटत होतो. थंडीने गारठलेले काही जन आगीच्या शेकोटी समोर बसून उब घेत होते व गरम गरम चहा चा आनंद लुटत होते. हळू हळू उजेड पडू लागला, समोरच्या कळसुबाई शिखरावर सूर्याचे किरण पडताच अखंड कळसुबाईचा डोंगर तांबड्या रंगाने रंगून गेला जणू काही देवी कळसुबाई लाल रंगाच्या शालूत अवतरली असावी. मफलर आणि स्वेटर्स घालून ट्रेकर्स शिखरावर स्वारी करण्यात सज्ज झाले. "पुंडलिक खाडे" दाम्पत्याने गरमा-गरम पोहे व चहा तयार केले होते. गरमा-गरम पोहे व चहा चा आस्वाद सगळ्या ट्रेकर्स ने भरपूर लुटला. सकाळचा नाश्ता करून सगळे ट्रेकर गोल वर्तुळाकार करून दुर्गविहारच्या ओळख परेड साठी तयार झाले व प्रत्येकांनी आपआपली माहिती दिली. सुमारे सकाळी ७-७.३० चा सुमारात ट्रेकर्स कळसुबाई शिखर गाठण्यासाठी निघाले. सह्याद्रीच्या पर्वत रांगान मधे वसलेला कळसुबाईचा डोंगर चढताना माझ्या मनात गेल्या ७-८ वर्ष ट्रेकिंग च्या काही जुन्या आठवणी रंगू लागल्या. कळसुबाई शिखराचे टोक जसे-जसे जवळ दिसू लागले तसे-तसे उसुक्ता वाडू लागली.११.३०-१२.३० च्या सुमारात दुर्गविहारचा काफिला कळसुबाई शिखरावर येउन पोहचला.
कळसुबाई शिखरावर पाऊल पडताच महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर करण्याची मनातील एक इच्छा पूर्ण झाली बारी-कळसुबाई चा प्रवास माझ्यासाठी विस्मरणीय असा होता ते रेलीन्ग्स वरून चढणे आणि माकडान पासून आपला खाऊचा बचाव करणे , थकलेल्या ट्रेकेर ना प्रोत्साहित करून त्यांना मदतीचा हात देणे. कळसुबाई ट्रेकची एक विशेस बाब , किवा असे हि म्हणू शकता "Point Of Attraction” होती ती एक सहा वर्षाची चिमुकली "युक्ता चौहान”. सहा वर्षाची चिमुकली इतर ट्रेकर पेक्षा वेगळी आणि नीडर होती. तिला जो कोणी शिखर चढण्यात मदतीचा हात देई त्यांना ती खडखाऊन सांगत " I'll conquer this Kalsubai peak of my own". या चिमुकली युक्ता चे चिमुकले पाऊल जसे जसे कळसुबाई वर पडत होते, माझ्या मनात Edmond Hillary- 1st climber to climb Mt. Everest आठवला. Mt. Everest चढताना दोन वेळा त्याच्या पदरी अपयश आले, हार न मानता तो उलट Mt. Everest ला खडखाऊन सांगतो " I'll come again & conquer you one day, because as a Mountain you cannot grow but as a Human I can."
कळसुबाई वर पोचताच देवी कळसुबाईचे दर्शन सगळ्यांनी घेतले. कळसुबाई शिखरा वरून सह्याद्रीचे रौद्र्य स्वरूप डोळ्यात मावेनासे होते. सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये वसलेले काही गड किल्ले दर्शन कळसुबाई वरून होत होते- उत्तरेला- रामसेज , हरिहरगड, ब्रह्मगिरी, अंजनेरी, घारगड , बहुला, त्रिंगलवाडी , कावनई.
पूर्वेला औनध, विश्रामगड ,बितनगड.
पश्चिमेला-अलंग-मलंग-कुलंग, रतनगड.
तर दक्षिणेला पाबरगड, घनचक्कर, हरिश्चंद्रगड, तारामती, आजोबा.
पूर्वेला औनध, विश्रामगड ,बितनगड.
![]() |
| from Internet |
तर दक्षिणेला पाबरगड, घनचक्कर, हरिश्चंद्रगड, तारामती, आजोबा.
दिव्या-अर्चना ने या गड किल्ल्यांची थोडी माहिती ट्रेकरपर्यंत पोहचवली. सगळे ट्रेकर परतीच्या मार्गाकडे निघण्यास सज्ज झाले. त्या आधी दुर्गविहारचा ग्रुप फोटो काढण्यात आला. सुमारे संध्याकाळी ४.३० -५ च्या सुमारात सगळे ट्रेकर्स बारी गावात "पुंडलिक खाडे" यांच्याकडे पोहचले. भूक अफाट लागली होती "पुंडलिक खाडे" यांनी जेवणाची व्यवस्था केली होती. वांग्याची भाजी, पोळी, वरण-भात, लोणचे-पापड चा आस्वाद घेतला आणि घरी परतण्याची वाटचाल सुरु केली. बारी ते कल्याण या दरम्यान अंताक्षरीची मैफिल रंगली. सुमारे 10 पर्यंत बस कल्याणला पोहोचली आणि दुर्गविहारतर्फे आयोजित केलेला कळसुबाई ट्रेक सुफळ संप्पन झाला.
अशी होती ती कळसुबाई ट्रेक ची आगळी वेगळी मज्जा.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा