नाळेच्या वाटेने विसापूरची सफर….
३० सप्टेंबर सकाळी पनवेल वरून दुर्गविहारच्या भटक्यांचा कंपु… लोणावळ्याच्या दिशेने निघाला
लोणावळा – मळवली- पाटण करत नाळेच्या वाटेने विसापूर चढायला सुरवात केली……. पावसाळी दिवस असल्याने वाटेवर…जागोजागी निसर्गाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले….फुलपाखरे, चतुर, पावसाळी फुले, मधेच आमची तहान व थकवा भागवणारा झरा…… पाण्यातून जाणारी चढण …. आणिआम्ही भटके….
एकदाच्या पायऱ्या नजरेत आल्या आणि आम्ही सुटकेचा श्वास घेतला…..सर्वप्रथम दोन गुहा..मारुतीचे शिल्प नजरेस पडले….असे अलंकृत शिल्प सह्याद्रीत दुर्मिळ आहे…
गडावरील…एका पाण्याच्या टाक्याजवळ बसून जेवण उरकले….. विश्रांती घेऊन….किल्लेभ्रमण सुरु….पाण्याची टाकी , वाडयाचे अवशेष, टाक्याच्या भिंतीवर कोरलेले आणखी एक मारुतीचे शिल्प…. सुंदर मजबूत तटबंदी,….. चुन्याचा मोठा घाणा……कान्होजी आंग्रे यांना भेट दिलेली ब्रिटीश कालीन तोफ
समोर दिसणारा भातराशीचा पिनॅकल , लोहगड …दुरवर…तुंग व तिकोना किल्ले….त्यान जोडणारे पवना धरण….तो परिसर डोळ्यात भरून घेत…आम्ही परतीच्या वाटेला लागलो….
















टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा