कोरीगड-तुंग बाईक ट्रेक

कोरीगड आणि तुंग , लोणावळा , महाराष्ट्र बाईक ट्रेक -- तारीख १६ - १७ जून २०१२ वार -- शनिवार आणि रविवार .......संयोजकांचे खूप खूप धन्यवाद . ट्रेक यशस्वी केल्याबद्दल सर्व सभासदांचे आभार ......ट्रेक मध्ये खूप खूप मजा आली ...माझा पहिलाच बाईक ट्रेक ----संभाजी राजे भोसले अशी व्यक्ती - मला २ दिवस बाईक च्या मागे घेऊन फिरवणारी ......सकाळी लवकर उठून गाठलेले पनवेल , ती सुरवात एका प्रवासाची ते १० बाईक अन ते १९ स्वार , आणि मग पहिला टप्पा लोणावळा , ती अन्नपूर्णा मधली मिसळ ,ती जाम फळे अन्नापुर्नाची , मधेच थांबलो ते टायगर हिल वरच फोटो शूट अन तो काळा कुत्रा - काय ते डोळे त्याचे , ते पेठ शहापूर आणि पुढे गेलेले काही अति उत्साही प्रवासी , अरे ते कासव मस्तच होता न ,ओळख परेड --------- तो कोरीगड , तो सोप्पा रस्ता , दुसरे ग्रुप आले होते , हिरवळीची मजा घेतली ना हो ??? ...... माकडाचं कुटुंबप्रेम , ते ३ गिर्यारोहक अंगावर काटा आणणारे , ती रेस्कू टीम हे हे , देवीचे देऊळ , त्या तोफा , ती अप्रतिम तटबंदी , धन्य ते राजे अन ते मावळे !!!! तो आलेला पाऊस ते ढगांचे लोट , दुपारचे जेवण छोट्या पापड बरोबर , बाजूच्या टेबल वरचा सुकट-जवळा च सुवास आठवतोय का हो ???? कोरीगड ते तुंग निरव रस्ता , बापरेरेरेरेरे , तुंग वाडी मधला कोरा चहा दुधाचे शोध घेत असलेले डोळे पण नंतर मात्र मस्त वाला कोरा चहा, शाळे मधले ते काका झोपेतले , खडूस होते का ??? मी तर भेटलोच नाही त्यांना ! ते आपले मामा-आजोबा , काय होते ते नियम त्यांचे -- इंधन गेल्यावर बदलणारे ,पण त्यांनीच केली हो सोय राहायची ' भैरवनाथ ' देवळात , ती बादली हे हे , शाळा ते देऊळ हा बाईक चढवायचा खटाटोप , ते पत्रे ,खेकडा -------- रात्रीचा डाळ-भात त्या आजींच्या हातचे ,ते टीम टीमणारे काजवे , घेतले होतेच त्याना हातामध्ये , थोड्याच वेळात टप टप करणारे देवळाचे छत , ती एक गुप्त शोध-मोहीम , ती शेकोटी त्या गप्पा न आठवणी , ती संदीप सलील यांची मेहफिल ,पण काही माणसे झोपली होती - कशी ते पहिलीत ना सगळ्यांनी , रात्रीचे ते घोरणे ----डोबल फायरिंग , रात्रीची मोठ्यांची गाण्यांची मेहफिल , रात्रीचा विजांचा चम चामात ------तो ही गरज नसताना ----अहं अहं ,तो नंदी , झोपा आता ------आता दुसरी सकाळ ---- सकाळचे निसर्ग सौंदर्य आणि त्याचा आस्वाद आहाहाहा .....काय ते ,पाणी कसे बरे पुरवून वापरले होते न , दात न घासता केलेला फराळी नाश्ता , तो उतुंग तुंग , त्या तुंगच्या पायऱ्या , ती रानटी केळ्यांच्या झाडांची रांग ----- काय तो आकार न उकार , तो दरवाजा , वाराच तो काय --- जणू उडवून देणारा सर्व काही , ती घाई कॅमेरा काढायची अन पाऊस आल्यावर परत लपवायची , तुंगाई देवीच मंदिर , उतुंग शिखरावर केलेलं ते फोटो शूट .....काय रे देवा काढलेले फोटो , उतरताना झालेल्या छोट्या मोठ्या गप्पा आणि टोमणे हे हे , ती पायवाट घसरती आआआआ , ती बाईक खाली उतरवायची कसरत भ्रूम्म्म भ्रूम्म , परतीचा लोणावळा टायगर हिल , तो बोचरा वारा , टोचणारे थेंब , लागलेली भूक अन ती मिसळ , ती कानातून धूर आणणारी तरी न ठेचा कांदा भजीसोबत , परतीचा प्रवास , अन गाठलेले पनवेल संध्याकाळी ६ वाजता आणि असे सर्व सुखरूप पोहोचले आपापल्या घरी -----खूप आभार ------अशाच अजून बऱ्याच क्षणांची वाट पाहतोय हो आम्ही कुणाल सरपोतदार आणि मित्र परिवार 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट