एक चिन्ब भिजलेला ट्रेक - राजमाची


तारीख २८ - २९ जुलै २०१२ वार शनिवार - रविवार -

सर्वप्रथम दुर्गाविहारचे मनापासून आभार आणि चूकभूल माफ असावी एवढीच विनंती ----
नचिकेत कुणाल प्रफुल ( बाजी ) दिव्या या चौकडीचे आभार आणि या सर्वांबरोबर माझी ओळख करून देणाऱ्या अर्चनाला खूप खूप धन्यवाद!!!
सांगतो एक गोष्ट तुम्हाला , त्या अनुभवाची म्हटलं तर स्वर्ग नाही म्हटलं तरीपण तो स्वर्गच - आठवडे आधी हो नाही हो नाही - एक रात्र आधी नक्कीच नाहीच पण शेवटी उडाली ती झोप गेली ती भूक भरली ती बैग आणि मारली ती किक बाईकला मालाड वरून - झोपलो पहाटे वाजता अन उठलो वाजता - ट्रेकचे वेड असते ते यालाच म्हणतात का हो ?




असो , सकाळी कोणालाही सांगता गाठलेले पनवेल - वाटत होत कि जर उशीर झाला तर निघतील सगळे पण .......शेवटी झालीच भेट एस टी स्थानकावर - बाईक अध्यक्षांच्या घरी ठेऊन धावतच पकडली जुन्नरची गाडी वाजता - बस मधेच झाली सुरवात , मजा मस्ती मस्करी - आणि हो या वेळीच ओळख झाली श्री. पोत्याभाई --------अहं अहं - जाऊदे पुढे सांगतो काय काय ते - नेहमीची जागा शेवटची - पाहतो तर काय मुले बसली आहेत अन मुली उभ्या - उठवले दोघांना बसवले तिघींना ( बारीक आहेत हो बिचाऱ्या ) - बोलता बोलता लोणावळा आले - सगळे उतरले पण , नचिकेतची बैग लपून बसली होती , पण गावली नंतर शोधल्यावर - जसे बिछ्यान्यातून जमिनीवर तसेच गाडीतून अन्नपूर्णाच्या टेबलावर -
जिभेला जरा बदल म्हणून नेहमीच्या मिसळ पेक्षा खिचडी एवढच बाकी मिसळ काय खाल वा वा !! - ' जेवण वाया घालवल्यास ज्यादा पैसे आकारले जातील ' ( एक पुणेरी पाटी ) - चला उठा आणि चालू पडा - वाट ती राजमाची कडची - सांगितले होते , कि फक्त चालायचे आहे - एक दोन एक दोन बास्स्स्स एवढच ! - चालता चालता समोर आले ते धरण - तुंगार्ली तलाव , थांबलो - सगळ्यांनी आपापले कॅमेरे काढले - आणि या वेळी तर काय कॅमेरे कॅनोन ५५० - मी तर गप्पच बसलो - काढला पण ना
ही माझा छोटुसा कॅमेरा - थोडेसे फोटो काढून ओळख परेड -



बरेचसे नवीन अन बरेचसे जुने - मृणालिनी या वेळी पण भेटली - खरच हौशी - मोनिका ची बहिण - दुसरी मनी माऊ - काहीच बोलत नाही - पुन्हा एक दोन एक दोन बास्स्स्स एवढच ! - 


वाटेत लागणारे छोटे मोठे बदबदे म्हणजेच धबधबे हो - एक आला थांबलो दुसरा आला थांबलो - काही खूपच छोटे छोटे झरे होते , वाटत होते कि यांचे पण मोठाले धबधबे करावेत पण दुसर्यांचा विचार करता वाटले कि नको राहूदे -उगाच कशाला , थंड पाणीच बर वाटतं - चालता चालता पुढे मधेच ...भ्रूम भ्रूम भ्रूम्म्म्मम - सगळेच थांबले - पाहतो तर काय ? त्या डर्ट बाईक्स - ग्रीप वाले टायर , जेकेट , बूट , हेल्मेट वरचे कॅमेरे - एक अप्रतिम सवारी प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी - पुढे काय परत एक दोन एक दोन बास्स्स्स एवढच ! - मधेच कोणीतरी वाट वाकडी केली कि थांबायचे आता एक कि मग दुसरा हे चालूच राहायचे - काही नवीन भावी फोटोग्राफर भेटले तेजल आणि दिव्या - खरच , मेहनती तर वाटले , बघूया पुढे - त्यांना शुभेच्छा - पुढे गेलो आणि समोर एक खूप मोकळी जागा तो छोटा झरा आणि डाव्या बाजूला खोल खोल असलेला कडा - त्याच धबधब्यात सुरु होते रोमांचकारी रेप्लिंग आणि अजून काही खेळ - वाटल कि कराव पण नाईलाज होता - तिथली मजा मग चहावर - कांदा भाजी खाल्ली का हो ? नाही वाटतं , आठवत नाही . हो पण ती जनता ची चकली मात्र आठवते हो राजू मामा - तिथे त्या पाण्यात आल्या मग पी पीप ........ x गाड्या - त्यांचं ते चालवणे खरच ते पाहण्यासारख होत - शेवटी पाय तर उचलायला हवेच कारण आपल लक्ष होता ते राजमाची - तेव्हाच कळले कि मागचे खूप मागे राहिले अन पुढचे खूप पुढे गेले , आम्ही मात्र मधल्या मध्ये .........- मजल दरमजल करत आडवे आले उल्हास नदीचे पात्रं - उगम तिथलाच तिचा - त्यापुढे तो रस्ता म्हणजे , दोन्ही बाजूला अरण्य , मधेच तो चिखलाचा रस्ता वरून कोसळणारा पाऊस पोटामधले कावळे - काहींच्या चपला तुटल्या काहींच्या बैगा तुटल्या काहींचे तर संयमच तुटले - असो शेवटी सगळे एकत्रच भेटले - वाटेत मधेच लागला तो मिनी कोकणकडा - खरच तिथे नाहीतर इथे , कुठेतरी पहिला - पुढे चिखालातली वाट , मधेच पडायचे पुन्हा उठायचे आणि चलायला लागायचे - पायाला चिखल हाताला चिखल कपड्याला चिखल काहींच्या तर बुडाला पण चिखल - नुसता चिखलाच चिखल ! - कारण काय ? तर पाऊस आणि गाड्या - सगळेच शिव्या घालत होते त्यांना - एक गाडी आली कि सगळे रस्त्याच्या कडेला पालीसारखे चिटकायचे आणि त्यांना शिव्या घालायचे मनातल्या मनात , घातल्या हो सगळ्यांनी - चिखल संपला पाऊस पण संपला आणि आम्ही गावात पोचलोउधेवाडी ‘–संध्याकाळी वाजता-
ती जागाच मस्त होती कारण तिथे मिळणार होते पोहे आणि चहा - काय आठवतंय - ती माझी फरसाणची पिशवी तिचे छोटेसे छिद्र सगळ्यांनी हात घालून घालून काय केले होते रे देवा - तिथे सर्वजण वाट पाहत होते कपडे बदलायची - विचार हेच कि कपडे बदलुन पुन्हा भिजायचे कि याच कपड्यात कुजायाचे - काहींनी बदलले आणि काहींनी सुकवले मी मात्र कोरडाच होतो नवीन रेनकोट होता माझा - ते सगळे आटपून निघालो मंदिर पाहायला -
एक जूनच मंदिर - असा ऐकलय कि त्या मंदिराचा कळस दिसला एकाला आणि मग ते खोदून काढले आणि मिळाले एक पुरातन हेमाडपंती गोधनेश्वर शिवमंदिर - त्याची बांधणी म्हणजे एकमेकांत खोबणीत अडकवलेले खांब - नंतर तो तलाव आणि परतीचा मार्ग - तेव्हा गडबड कसली , तर दोऱ्या बांधून त्यावर पताके लावायची , त्यात पण घाई ......काय रे देवा ! -काही उंच उंच मित्रांनी ' उंच माझा ........हात ' असल्याचा भावनेने मदत केली हो - संभाजी कुणाल नचिकेत आणि इतर - आलो कपडे बदलून , म्हटल थोडासा आराम - कसला आराम परत भूक - अजून आठवतंय ती मेजवानी - चपाती मटकीची भाजी भात वरण आणि अजून ???? - असं ऐकलय कि सगळ्यांना वाढून होईपर्यंत काहींच जेऊन झाला होत- काही असो पोट भरलं हे महत्वाचे - तिथल्या नामदेव काकांनी तो दिवा आणून दिला रात्रीसाठी - आता ' जिथे मिळे आसरा तिथे हात पाय पसरा 'जेवल्यावर काही वयस्कर मंडळींनी जागा पकडून झोपायच्या प्रयत्न केला खरा पण काही अति उत्साही माणसांमुळे ते वैतागले - कारण सुद्धा तसेच होते - अहो ट्रेक ला आलो आहोत देवदर्शनाला नाही - उठा उठा मेहफिल जमवायची आहे कि नाही ? - चिन्मयने मिळवले टाकीचे झाकण बाकीचे मात्र आपला हात जगन्नाथ .....कशासाठी ??? अहो गाणी गाताना गाण्याला ठेका नको का !!! काय तुम्ही पण - दोन गट झाले ....एकदम मस्त तयारीत - आम्ही जरा दुबळेच होतो त्या मानाने , पण ठीकेय आता तर भिडायचच !! - एक एक करत अफलातून गाणी बाहेर येत होती - कधी मराठीचा ठेका तर कधी दर्द भरी हिंदी -काही जण भटकंतीला गेले होते रात्रीची सफारी , काय पहिले त्यांनाच माहित - मधेच काय माहित काय झाले - एका वेड्याच्या मामाची तार आली मुंबईहून - आठवतेय का ' मुंबईहून आली मला तार ....... मामा मला ……..' - जाम मजा आली तेव्हा तर , धन्यवाद मित्र मैत्रिणींनो - हि नशा कमी होते होते तोच विचार केला थोड देवाच नाव घेऊ अन मग टाळ साठीचे झाकण याच्या गजरात ' हम तो राधे शाम कहेंगे , हम तो सीता राम कहेंगे ' या गजरात सारा गाव जागा केला असेल - म्हणता म्हणता रात्रीचे १२ वाजले आणि आठवले - कुणाल सरपोतदार यांचा जन्मदिवस झाला २६ तारखेला - त्या साठी छोटीशीच प्रेमाची भेटवस्तू अन त्यात एकलियरस पण - कदाचित रागावला असेल माझ्यावर , असो …..पण लक्षात तरी ठेवेल त्या निमित्ताने - हे आटोपला आणि सगळे झोपले - या वेळी संदीप सलील नाही आले हो रात्री :-( तन्मय , कुठे होतास रे तू ? - रात्री दिवे बंद झाल्यावर मधेच हा हा हु हु हि हि ----हे काय ते आधी कळलंच नाही - मग समजले कि कोणीतरी चादरीला क्रीम लावत होता , काळोखात तेवढा पण कळत नाही एवढे दामले होते बिच्चारेरेरेरे - आणि सगळे गुडूप
दुसरी सकाळ - पहाटेचे - कुणाल सगळ्यांना उठवत होता- अरे कुणाल उठतो रे ! अरे थोडा वेळ थांब अजून !! - पण काय करणार उठायचं तर होतच सगळ्यांना - आणि मग पुन्हा सगळे टारझन झाले - निसर्गाला द्यायला निघाले - ऊऊऊओ - कोण इथे तर कोण तिथे तर कोणी त्या पलीकडे - आटपून सगळे ठरले कि एक पिशवी नि त्यात सगळा खाऊ - अरे पण नाश्ता ? तो 




आल्यावरच - झाले तर मग काहीजण भिजायच्या तयारीत एकदम - आधी निघालो ते ' श्रीवर्धन 'कडे - वाटेत डाव्या बाजूला पाण्याची टाकी / राहायच्या जागा - पुढे भैरवनाथ मंदिर - आणि मग सुरवात त्या बालेकिल्ल्याची - सगळे कॅमेरे सरसावले - काही जण पुढे तर काही मागे - हेमांगीचे पाय खूप दुखत होते , पण बाजी , तो असताना कोणी कधी काहीच चुकवू शकत नाही - वर गेल्यावर मस्त काय तो नजरा होता -तो मनरंजन ती ढाक बहिरी ची रांग, मांजरसुंभा...... - परत चढायला सुरवात - गडावर गेल्यावर डाव्या बाजूने चढलो होतो , म्हणजेच मागची बाजू - तिथला तो बुरुज - गुडघाभर पाणी - त्यात पण हौस काय हो - बाजूला खेकडे असताना पण त्यातून वाट काढत गोल फिरून यायची मजा काय ती आम्हालाच माहित - मोनिका आली होती का पाण्यातून ??? घाबरते ती - नंतर मुख्य बुरुजावर पोहोचलो - तिथून तर अजूनच मस्त , काय तो परिसर होता , हिरवागार निसर्ग , काळा काळा कातळ , त्यातले धबधबे आणि सोबतीला आपला मित्र परिवार अजून काय हवे ! - मग स्वारी निघाली गड उतरायला - तिथे उतरताना पुन्हा दिसली काही पाण्याची टाकी / रहायची जागा - कोणत्या तरी पक्षाचे घरटे अन त्यातली चिमुकली पिल्ले - काहींनी फोटो काढले आहेत मस्त

अरेरे सांगायचे राहिले ,पावसाने कपडे भिजलेल्या क्षणी ते मक्याचे भाजलेले कणीस , कोणी कोणी खाल्ले हात वर करा ? - अहो खाऊची पिशवी मागेच राहिली , आणली मग कोणीतरी जाऊन - तो पर्यंत एवढी भूक लागली होती कि पुन्हा भैरवनाथकडे आल्यावर वाटले कि जाऊदे मनरंजन…… जाऊन करूया नाश्ता -
पण काहींच्या आग्रहाखातर केली सुरवात चढायला मनरंजन - कोण कोण ??? – वाटेतच भेटला तो हनुमान- कोणी कोणी 



पहिला ?- वर गेल्यावरच पाण्याच्या टाकीत दिसलेला तो साप - ती गडबड त्याचे फोटो काढायची - पुढे दिसला तो तलाव , ते छत नसलेला धान्याचे कोठार -त्या अनिमेशला कसे बोटांवर उचलला होता - ते मशरूम पांढरा पांढरा - बाजीने खाल्लं ते - मशरूम ला लहानपणी काय म्हणायचे ???............ आणि का म्हणायचे - तेव्हाच दिसले कि आम्ही मनरंजन वर आणि बाकीचे श्रीवर्धन वर हुशश्श्श्स - चला मनरंजन पण उतरुयात - धावत धावत उतरलो ते थेट विश्रामगृहपाशीच - आणि मग लगेच नाश्ता - पोहे आणि चहा , आहाआआ भूक एवढी कि आधीच प्लेट झाले पटापट - तेव्हाच कळले कि जेवायला वांग्याची भाजी , मग काय और प्लेट - जवळपास सगळेच - प्लेट पोहे चहा नक्कीच - काय बरोबर ना ? - खाऊन मग आटोपून कपडे आणि बैग भरून आराम - मग जेवायला गरम गरम भाकऱ्या नाचणीच्या , ठेचा , वरण भात , भाजी पण मस्तच होतीत्या गावातला छोटसं गब्बू गब्बू कुत्र्याचा पिल्लू-



चला आता उतरायचे - कुठून तर कर्जत मार्गे - बापरेरेरेरे - झाली सुरवात - पुन्हा एक दोन एक दोन बास्स्स्स एवढच ! - पण या वेळी एक एक पाऊल जरा जपूनच - नजर हटी दुर्घटना घटीखरच , हसताय काय ? - उतरताना प्राजक्ता होती सोबत , घाबरत घाबरत - धडपडी अर्चना आणि या वेळी हृषीकेश पण- ते मधले धबधबे पार करताना केलेला तो ब्रिज म्हणजे अफलातून अनुभव - धन्यवाद कुणाल बाजी नचिकेत संभाजी हृषीकेश अनिमेश लौकिक राजूमामा ओमकार निखील मोहित आणि अनिकेत - पावसाचे नितळ पाणी रौद्र रूप कसे धरते याचा पण भयानक अनुभव काहींनी घेतला - उल्हास नदीचे पात्रं तर खूपच छान - मग ती कोंढाणे लेणी , २०००-२५०० वर्ष जुनी - १०० फुटांवरून कोसळणारा धबधबा - अप्रतिम ! या एकाच शब्दात वर्णन - मधेच धावता धावता पडणारे काही ट्रेकर्स - वाटत होते कि पाय हातात घ्यावे - ' बसलो कि उठणार नाही आणि उठलो कि बसणार नाही ' अशी गात साऱ्यांची - वाढणारा काळोख - घरी जायची ओढ -
मग एका ठिकाणी म्हणजेच कोंदिवडे गावात चहा - ती घमेल्यातली शेकोटी - मागे ठेवलेले अंड्याचे ओम्लेट , काय रे संभाजी हृषीकेश - मग टम टम - आणि पोचलो कर्जतला ३० मिनिटात - रात्री .३० ची गाडी पकडून मुंबईला रवाना -सगळे आपापल्या स्थानकावर उतरले - मी मात्र कांजुरमार्ग ला उतरून मग रिक्षाने मालाड

आणि असे सर्व सुखरूप पोहोचले आपापल्या घरी -----खूप आभार ------अशाच अजून बऱ्याच क्षणांची वाट पाहतोय हो आम्ही कुणाल सरपोतदार आणि मित्र परिवार ------

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट