सांदण दरी ॲडव्हेन्चर कॅम्प.....
ट्रिंग ट्रिंग ..... ट्रिंग ट्रिंग....
हॅलो......
कुठे पोहोचलास?
मीटिंग पॉईंट.ठीक आहे मि पण पोहोचतो. बस पण पोहोचेल पाच मिनिटात.
कुणाल सोबत फोन वरुन बोलणे झाले आणि अजून कोणी हजेरी लावली नाही त्यांना फोन करायला सुरुवात केली. काही महाभाग तर फोन केल्यानंतर घर सोडले. भारतीय वेळेप्रमाणे सगळे जमा झाले....
गणपतीच्या जयघोषात गाडी ठरलेल्या ठिकाणा वरुन निघाली. तोपर्यंत कल्याण ला भेटणारी सगळी मंडळी कल्याण रेल्वे स्टेशन ला जमा होउन आमची वाट बघत होती तासभर उशीरा पोहोचलो होतो.तिथे पोहोचल्यावर समजले कि अजुनहि दोघेजण घाटकोपर-ठाणे-डोंबिवलीच करत आहेत ते येइपर्यंत बस मधल्या सगळ्यांचि उकाड्याने आंघोळ झाली होती. एकतर आधीच उशीर झाला होता त्यात अजून भर पडली.
एकदाचे सगळ्यांना घेऊन बस साम्रद गावाच्या दिशेने निघाली. गाडी सुरू झाल्यावर सगळेजण झोपेतच प्रवासाचा आनंद घेत आपआपली गाडी चालवत होते. आम्ही सगळ्यांनी पुढे बसून गप्पाचा खेळ मांडला होता. त्यातच दोन दिवसांच्या ॲडव्हेन्चर कॅम्प मध्ये आपल्याला ठरलेल्या वेळेचे काटेकोरपणे पालन कसे करता येइल याविषयी चर्चा चालू होती. ड्रायव्हर काका बिचारे बस चि स्टेरींग गोल गोल फिरवून घाटातून गाडी चढवत होते.
भल्या पहाटे साम्रद गाव गाठले कडाक्याचा उन्हाळा असूनही वातावरणात बऱ्यापैकी थंडावा होता.
कुणाल आणि मी बस मधून उतरुन प्रकाश भाऊ च्या घराकडे धाव घेतली (प्रकाश भाऊ ज्यांच्या इथे आमची राहण्या खाण्याची व्यवस्था केली होती). तेही बिचारे पहाटे साखर झोपेतच होते. त्यांना जागेकरुन आमची सगळ्यांचि फ्रेश होण्याची धडपड सुरू झाली. तोवर भाऊंनी आमच्या साठी गरमागरम पोहे आणि चहा बनवला.

नाष्ट्याचा मनसोक्त आनंद घेऊन आमचा मोर्चा दरी च्या दिशेने वळाला. नेहमी प्रमाणे ट्रेक च्या आधी आलेल्या सगळ्या ट्रेकर्स चि ओळख व्हावी म्हणून एक छोटीशी ओळख परेड घेऊन सगळ्यांना माहिती वजा सूचना देउन सगळे
झिप लाईन (व्हॅली क्रॉसिंग)च्या दिशेने निघाले.
जातांना बऱ्याच जणांच्या मनात शंका होती आम्हाला जमेल का? आमची मुल करतील का? झिप लाईनच्या ठिकाणी येउन त्याबद्दलची माहिती देउन ॲडव्हेन्चर कॅम्प चा श्रीगणेशा करण्यात आला. पहिल्यांदा एक प्रात्यक्षिक करून दाखवले आणि मग छोट्या ट्रेकर्स ची पहिले जाण्यासाठीची लगबग सुरू झाली.
काहीजण क्रॉस झाल्यानंतर पुढे दुसरीकडे रॅपलिंग चा सेट्अप लावला. तिथे पोहोचल्यावर मात्र दरी पाहून तारे चमकले आलेल्या नवीन पाहुण्यांनी विचारायला सुरुवात केली. आम्ही करु शकतो का? मुलांना जमेल का? तेव्हा त्यांची मन:शांती करून एक एक जण सर सर करत दरीतून खाली उतरायला सुरुवात झाली.
काहींनी तर एकदा उतरवून उस्फुर्तपणे पुन्हां उतरण्यासाठी हजेरी लावली. कदाचित पहिल्यादा उतरताना जिवात जिव नसावा त्यामुळे पुन्हां काही जमतय का या विचाराने पुन्हां हजेरी लावली असावी. महिला वर्गाने तर रॅपलिंग केल्याकेल्या दगडाचा आश्रय घेऊन वामकुक्षी घेतली त्यावेळी तो काळाभोर दगड सुद्धा त्यांच्यासाठी मउ मखमली गालीचानी सजविलेल्या बेड पेक्षा श्रेष्ठ ठरला असावा. या सगळ्यात सुर्यनारायण माथ्यावर कधी पोहोचले समजलेच नाही.
त्यात सुर्यनारायणांना दरीत प्रवेश नसल्याने तिथे बऱ्यापैकी गारवा होता. त्यामुळे बेस कॅम्प ला जाण्यापेक्षा सगळ्यांनी तीथेच थांबणे पसंत केले. सर्वजण सुखरूप खालील उतरल्यानंतर
वरती आम्ही दुर्गविहार चे दोन खांब राहिलो होते. तसे आम्ही पहिल्या वेळेस उतरून पुन्हां हजेरी लावली होती. शेवटी उतरताना कमांडो रॅपलिंग करण्याचे भुत मनात होते. परंतु उतरण्याचा पहिल्यांदाच प्रयत्न असल्याने. लॅडिंग तर यशस्वी झाली परंतु मधल्या भागात हॅंग ओव्हर असल्याने थोडाफार लटपटला. हे सगळ आटोपून सगळ्यांनी बेस कॅम्प कडे धाव घेतली कारण या सगळ्या धावपळीत सकाळचा नाष्टा कुठे गेला हे कुणालाही कळले नसावे त्यामुळे प्रचंड भुक लागली होती. बेस कॅम्पला जाताना मध्येच करवंदाची बाग (निसर्ग निर्मित) लागली तिथे मनसोक्त ताव मारला तोपर्यंत लीडरने सगळ्यांच्या नावाने ओरडायला सुरुवात केली. तेव्हा कुठे त्या
करवंदाच्या झाडांनी मोकळा श्वास घेतला.

गरमागरम वरण भात चपाती आणि नगर करांची प्रसिद्ध शेव चि भाजी सोबतीला पापड लोणचे यथेच्छ जेवण करून शेजारीच असलेले मंदिर गाठले. कधी नाही ते मंदिराला सुध्दा जत्रेचे स्वरूप आले होते. थोडावेळ का होइना पण मंदिरातल्या देवाला सुद्धा प्रसन्न वाटले असेल. कारण इतके सगळे भक्त नवस फेडण्यासाठी लोटांगण घालत मंदिरात आले होते. मनसोक्त आराम झाल्यानंतर सगळ्यांना जागृत करण्यात आले.
मंदिराच्या गर्भगृहाला मागच्या बाजूला एक अर्धमंडप आहे. पुढे एक मंडप, अंतराळ व गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. मंदिराच्या रचनेत खाली थरयुक्त चौरस तळखडा असून वर नक्षीकामाने सुशोभित असे चौरसाकृती खांब आहेत. या खांबांचा वरचा भाग अष्टकोनी असून त्यावर वर्तुळाकृती आहेत. अगदी वरती कीचकहस्त आहेत. मंडपाचे छत घुमटाकार असून त्यावर ठरावीक अंतर सोडून नर्तक व वादकांच्या तिरप्या प्रतिमा आहेत. मंदिराचे शिखर भूमिज प्रकारचे असून शिखरावर चारही बाजूंनी एक एक अशा चार वेली आहेत. अशी बरीचशी मंदिरा बाबतची माहिती इतिहासकारांनी सांगितली. या मंदिराला ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. अशी शासन दरबारी नोंद आहे. मंदिराची माहिती घेऊन पुन्हां मागरी फिरलो. मंदिराच्या आधी एक पुष्करणी आहे त्या पुष्करणीच्या चहुबाजूने असलेल्या खिडक्यानमध्ये देवांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. त्यातील विष्णू चि मूर्ती ओळखता येते. बाकीच्या मूर्त्यांची घडनावळ हि दक्षिणात्य प्रकारची आहे. त्यामुळे त्या मूर्त्यां कोणत्या देवांच्या आहेत हे समजून येत नाही.

दिवस भराच्या धावपळीने आता प्रचंड भुक लागली होती. त्यामुळे आम्ही प्रकाश भाऊ च्या घरी धाव घेतली येउन बघतो तर आम्ही येण्याआधीच जेवणाच्या पंगती बसल्या होत्या. माझ्या ट्रेकिंग च्या अख्या वाटचालीत पहिल्यांदा ताटात पनीरची भाजी बघितली असेल. पंगतीत पनीर बघून आणखीनच भूक वाढली मग काय हळूहळू सरकत पंगतीचा एक कोपरा पकडून ताव मारला. आणि मी काही केलच नाही असे भासवून बाजूला झालो. सगळ्यांचे जेवण आटोपल्यानंतर ठरल्या प्रमाणे काजवे पहायला जायचे होते परंतु काजवे मोहोत्सवाचे वातावरणात गढूळ झाल्याने जायच कि नाही असा संभ्रम चालू झाला. सगळ्यांचा विचार घेऊन आम्ही जायला निघालो. परंतु जाण्या आधी सगळ्यांना सूचना देण्यात आल्या आपल्या कडून काजव्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. आणि त्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून घेण्याची जबाबदारी दुर्गविहार टिम च्या खांद्यावर होती. सगळ्यांनी दुरूनच काजव्याचा आनंद घेत परतीच्या वाटेकडे वळलो. दिवस भराच्या धावपळीत सगळेच थकले होते परंतु दुर्गविहार चे खगोलशास्त्रज्ञ प्रथमेशने सगळ्यांना जमा करून आकाश दर्शनास सुरुवात केली. तर काहींनी आपआपले टेंट पकडले. रात्री बऱ्याच उशीरा पर्यंत आकाश दर्शनाचा खेळ चालू होता.
दरीतून परतताना दुर्गविहार ची नेहमी प्रमाणे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहीमेत छोट्या ट्रेकर्स चा उस्पुर्त प्रतिसाद लाभला. सगळ्यांचाच खूप चांगला प्रतिसाद लाभला. येतांना दगडांच्या कानाकोपऱ्यात लपलेल्या बाटल्या, वेफर्स/बिस्किट चे कव्हर्स, इतकेच नाही तर दारू च्या बाटल्या सुद्धा कचऱ्यात गोळा झाल्या हे सगळ गोळा करून आम्ही दुपारच्या जेवणासाठी पुन्हां प्रकाश भाऊंच्या घरी येउन ठेपलो.
काहीजण क्रॉस झाल्यानंतर पुढे दुसरीकडे रॅपलिंग चा सेट्अप लावला. तिथे पोहोचल्यावर मात्र दरी पाहून तारे चमकले आलेल्या नवीन पाहुण्यांनी विचारायला सुरुवात केली. आम्ही करु शकतो का? मुलांना जमेल का? तेव्हा त्यांची मन:शांती करून एक एक जण सर सर करत दरीतून खाली उतरायला सुरुवात झाली.काहींनी तर एकदा उतरवून उस्फुर्तपणे पुन्हां उतरण्यासाठी हजेरी लावली. कदाचित पहिल्यादा उतरताना जिवात जिव नसावा त्यामुळे पुन्हां काही जमतय का या विचाराने पुन्हां हजेरी लावली असावी. महिला वर्गाने तर रॅपलिंग केल्याकेल्या दगडाचा आश्रय घेऊन वामकुक्षी घेतली त्यावेळी तो काळाभोर दगड सुद्धा त्यांच्यासाठी मउ मखमली गालीचानी सजविलेल्या बेड पेक्षा श्रेष्ठ ठरला असावा. या सगळ्यात सुर्यनारायण माथ्यावर कधी पोहोचले समजलेच नाही.
त्यात सुर्यनारायणांना दरीत प्रवेश नसल्याने तिथे बऱ्यापैकी गारवा होता. त्यामुळे बेस कॅम्प ला जाण्यापेक्षा सगळ्यांनी तीथेच थांबणे पसंत केले. सर्वजण सुखरूप खालील उतरल्यानंतरकरवंदाच्या झाडांनी मोकळा श्वास घेतला.

गरमागरम वरण भात चपाती आणि नगर करांची प्रसिद्ध शेव चि भाजी सोबतीला पापड लोणचे यथेच्छ जेवण करून शेजारीच असलेले मंदिर गाठले. कधी नाही ते मंदिराला सुध्दा जत्रेचे स्वरूप आले होते. थोडावेळ का होइना पण मंदिरातल्या देवाला सुद्धा प्रसन्न वाटले असेल. कारण इतके सगळे भक्त नवस फेडण्यासाठी लोटांगण घालत मंदिरात आले होते. मनसोक्त आराम झाल्यानंतर सगळ्यांना जागृत करण्यात आले.
मग आमचा मोर्चा वळाला रतनवाडी च्या दिशेने. तेथे असलेले हेमाडपंती स्थापत्यशैलीचे पुरातन अमृतेश्वर मंदिर पाहण्यासाठी.
मंदिराच्या गर्भगृहाला मागच्या बाजूला एक अर्धमंडप आहे. पुढे एक मंडप, अंतराळ व गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. मंदिराच्या रचनेत खाली थरयुक्त चौरस तळखडा असून वर नक्षीकामाने सुशोभित असे चौरसाकृती खांब आहेत. या खांबांचा वरचा भाग अष्टकोनी असून त्यावर वर्तुळाकृती आहेत. अगदी वरती कीचकहस्त आहेत. मंडपाचे छत घुमटाकार असून त्यावर ठरावीक अंतर सोडून नर्तक व वादकांच्या तिरप्या प्रतिमा आहेत. मंदिराचे शिखर भूमिज प्रकारचे असून शिखरावर चारही बाजूंनी एक एक अशा चार वेली आहेत. अशी बरीचशी मंदिरा बाबतची माहिती इतिहासकारांनी सांगितली. या मंदिराला ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. अशी शासन दरबारी नोंद आहे. मंदिराची माहिती घेऊन पुन्हां मागरी फिरलो. मंदिराच्या आधी एक पुष्करणी आहे त्या पुष्करणीच्या चहुबाजूने असलेल्या खिडक्यानमध्ये देवांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. त्यातील विष्णू चि मूर्ती ओळखता येते. बाकीच्या मूर्त्यांची घडनावळ हि दक्षिणात्य प्रकारची आहे. त्यामुळे त्या मूर्त्यां कोणत्या देवांच्या आहेत हे समजून येत नाही.

पुष्करणीच्या बाजुलाच एका टपरीमधून चहा चा छान सुगंध येत होता अगदी टीव्ही मधल्या जाहिराती सारखा. मग काय मोह आवरला नाही आणि सगळ्यांचे पाय टपरीच्या वाटेकडे वळले. गुणकारी चहा ने अंगातला सगळा थकवा दुर झाला. आणि आम्ही पुन्हां साम्रद ला रवाना झालो पोहोचल्यावर कुणाल आणि माझी टेंट लावण्यासाठी ची धावपळ सुरू झाली. कारण खुल्या पठारावर वारा खुप होता त्यामुळे टेंट तग धरून रहातील याची आशा नव्हती. त्यामुळे टेंट पठारा पासुन थोडेसे खालच्या बाजूला लावले.
दिवस दुसरा......
आम्ही जागे होण्या आधीच सुर्यनारायण डोंगरा आडून डोकावत होते. सकाळी ६ वाजता अचानक
शिट्टीच्या आवाजने सगळे जागे झाले.
कासवाच्या गतीने सगळा पसारा आटोपून एक एकाने आपापली वाट धरली. साधारणतः ७:३० पर्यन्तं सगळे नाष्टा साठी जमा झाले. गर्मागरम म्यागी आणि चहा चा आनंद घेऊन सगळ्यांचा मोर्चा दरी च्या दिशेने निघाला. जाताना कुणाल ने सर्वांना एकत्र करून दिवस भराचे वेळापत्रक सांगतले आणि काही सूचना हि देण्यात आल्या त्या सूचना बऱ्याच जणांना थोड्या जड झाल्या असतीलही परंतु पर्याय नव्हता.
पुढे दरी उतरायला सुरुवात झाली. कुणी सशाच्या गतीने तर कुणी कासवाच्या गतीने चालत होते. दरीतील असणारे मोठ-मोठाले दगड मध्येच कुठेतरी पाणी या सगळ्यातून पार होण्याचा आनंद घेत सगळे दरीत ठरलेल्या ठिकाणी जमा झाले. तिथे प्रत्येकाने स्वताला हवेतीतके आणि हवे तसे फोटो काढून झाल्यावर एक ग्रूप फोटो काढला आणि परतीच्या वाटेला लागलो.
येताना मात्र सशांची चाल मंदावली.....
दरीतून परतताना दुर्गविहार ची नेहमी प्रमाणे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहीमेत छोट्या ट्रेकर्स चा उस्पुर्त प्रतिसाद लाभला. सगळ्यांचाच खूप चांगला प्रतिसाद लाभला. येतांना दगडांच्या कानाकोपऱ्यात लपलेल्या बाटल्या, वेफर्स/बिस्किट चे कव्हर्स, इतकेच नाही तर दारू च्या बाटल्या सुद्धा कचऱ्यात गोळा झाल्या हे सगळ गोळा करून आम्ही दुपारच्या जेवणासाठी पुन्हां प्रकाश भाऊंच्या घरी येउन ठेपलो.
गरमागरम जेवण तयारच होते लगेचच जेवणाच्या पंगती बसल्या. सगळ्यांचे जेवण आटोपल्यानंतर सगळ्यांना शेजारील मंदिरात जमा होण्यास सांगितले. तिथे सगळ्यांचे ट्रेक चे अनुभव जाणून घेण्यात आले व सगळ्यांना प्रशस्तीपत्रक देउन गौरवण्यात आले. आणि ट्रेकची सांगता करण्यात आली.
आम्ही सुध्दा प्रकाश भाऊंना पुन्हां येउ सांगून निरोप घेतला आणि बस च्या दिशेने रवाना झालो. सगळ्यांना घेऊन बस पनवेल च्या दिशेने निघाली. जेवण जास्त झाल्याने बऱ्याच जणांना गाढ झोप लागली होती तर संगीत टिम मागे गाण्यांच्या भेंड्या खेळत बसली होती. त्यातही छोटे कलाकार काही कमी नव्हते. येतांना बस ठाणे मार्गे आल्याने सगळ्यांना निरोप देत देत आम्ही पनवेल गाठले.....
सगळ्यांचे ट्रेक चे अनुभव ऐकून दुर्गविहार टिम ने केलेल्या धडपडीचे सार्थक झाल्याचे समाधान मिळाले.....
लवकरच पुन्हां भेटू..........
धन्यवाद...
मनोज म्हात्रे
दुर्गविहार टीम......

सुंदर...
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवा