दुर्गविहार ८ वा वर्धापनदिन ट्रेक किल्ले माणिकगड.
दुर्गविहार ८ वा वर्धापनदिन
ट्रेक किल्ले माणिकगड...
मि आणि माझी छोटी ट्रेकर
फेब्रुवारी महिन्यात माणिकगडाला भेट देउन आलो आणि कुणाल चा मेसेज आला. मार्च मध्ये
आपल्याला माणिकगड ट्रेक लावायचा आहे. कारण आठ वर्षां पूर्वी मार्च महिन्यामध्ये दुर्गविहार
नावाचा दुर्ग भ्रमंती करणारा एक ग्रूप अस्तित्त्वात आला आणि त्यानीं हाताच्या बोटावर
मोजता येतील इतकेच दुर्गवीर घेऊन दुर्गविहारचि निर्मिती केली. दुर्ग भ्रमंती बरोबर
ऐतिहासिक लेणी आणि ॲडव्हेन्चर कॅम्प घ्यायला सुरुवात झाली. बघता बघता दुर्गविहार नावाचा
वृक्ष इतका कधी पसरला समजलाच नाही.
.
आठ वर्षांपूर्वी नऊ दुर्गवीर
घेऊन निघालेला दुर्गविहार आज खुप मोठ्या उंच शिखरावर पोहोचला आहे.
पुन्हां एकदा आठ वर्षांनंतर दुर्गविहार
ने ७६ वा ट्रेक म्हणून माणिकगडाचि सैर करायची ठरवली आणि सगळी तयारी चालू झाली. नेहमीच्या
ट्रेक पेक्षा या ट्रेकचि एक वेगळीच विशेषतः होती. निमित्त होत ते म्हणजे आठव्या वर्धापनदिनाचे.
ठरल्या प्रमाणे सर्व तयारी
झाली. ट्रेकला जाण्याची इतकी उत्सुकता होती कि रात्री झोपच लागली नाही. आणि सकाळी सूर्य
उगवायच्या आधीच आम्ही ट्रेक साठी निघाल्याचे मेसेज ग्रूपवर यायला सुरुवात झाली. तशी
आमची सुद्धा धावपळ सुरू झाली. आणि ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो तर आमच्या आधीच बरेच दुर्गवीर
जमा झाले होते. त्यांचा उत्साह पाहून ट्रेकला आणखीनच रंग चढला. ठरलेल्या वेळेपेक्षा
उशीराने का होइना पण बस आली एकदाची आणि सगळ्यांनी बस कडे धाव घेतली.
गड सर करायला निघालेले मावळे.
गड गावातून स्पष्ट दिसत होता परंतु गडावर जाणाऱ्या वाटेची कल्पना कुणालाही नव्हती. मला आणि कुणाल ला गडावर जाणारी वाट माहिती असल्याने मी म्होरक्या चि भूमिका स्वीकारली तर कुणाल दमले-भागलेल्यांचे सांत्वन करत घेऊन येण्याचे काम कुणाल च्या खांद्यावर टाकले आणि गड जवळ करण्यासाठीचि धावपळ सुरू झाली
गडावर जाणारी वाट तशी घनदाट जंगलाचि होती परंतु संपूर्ण जंगल सागाचे असल्याने पानगळ झाली होती. आणि त्यातच वणवा लावला होता त्यामुळे सावलीचा कुठेही आसरा नव्हता. त्यातच सूर्यनारायण आग ओकत होते. साधारणतः सुरुवातीचा आर्धा-पाऊण तास सगळे एकत्र होते नंतर एक-एक गाडी दिसेनाशी व्हायला लागली.
पानगळ झालेल्या जंगली वाटा.
नंतर मग दोन ग्रूप झाले. पहिला ग्रूप पुढे जाऊन मागचा ग्रूप येण्याची वाट पाहत
होता. गडावर जाताना मध्ये गडाची माची लागते तिथे एक हनुमानाची मूर्ती आहे आणि बाजूला
सैनिकांच्या खोल्यांचे अवषेश आहेत. तिथे जाऊन आम्ही दुसरा ग्रूप येण्याची वाट
पाहत थांबलो. ते आल्यावर त्यांचा खो घेऊन आम्ही पुढे वाटचाल केली. कालांतराने खो-खो
सुध्दा बंद झाला. आणि पकडा-पकडी सुरू झाली. हा खेळ सुद्धा जास्त चालला नाही. कारण दुसऱ्या
ग्रूप मध्ये अंतर खूपच वाढले होते म्हणून कुणाल ला फोन करून आम्ही पुढे जाण्याचा निर्णय
घेतला.
संपूर्ण जंगलात गोल गोल भटकून गडावर पोहोचलो. गडावर पोहोचताच प्रथम चुन्याच्या
घाण्याचे दर्शन होते. पुढे गेल्यावर देवीचे मंदिर आहे परंतु त्यात सध्या देवीची मूर्ती
नाही. पुढे डाव्या बाजूस एक दरवाजा आहे तर उजव्या बाजूस दुसरा दरवाजा आहे.त्या दरवाजाच्या
वरती गणेशपट्टी आहे. पुढे गेल्यावर उजव्या बाजूला सैनिकांच्या खोल्यांचे अवशेष आहेत.
पुढे एक मोठे टाके लागते परंतु त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पुढे गडाच्या दुसऱ्या
बाजूस गेल्यावर खाली वाशीवलीचा धरण दिसतो. आणि वातावरण चांगले असेल तर समोर रुबाबदार
कर्नाळा किल्ला दिसतो. तोपर्यंत सगळ्यांच्या पाण्याच्या बाटल्या रिकाम्या झाल्या होत्या.
गडावर पाण्याच्या खुप टाक्या आहेत परंतु टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य तर नाही परंतु
पाण्यावाचून तडफडण्यापेक्षा ठीक आहे. तिथून पुढे डाव्या बाजूला थोडे खाली उतरून गेल्यावर
पुढे दोन पाण्याचे टाके आहेत त्यातील दुसऱ्या टाक्यातील पाणी त्यामानाने ठीक आहे परंतु
या टाक्या काठावर असल्याने जरा जपून जावे लागते.
चुन्याचा घाण गणेश पट्टी.

पाण्याचे टाके


पाण्याचे टाके.
तेथून पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन पहिले यथेच्छ स्वताची तहान भागविली आणि मग सोबत आणलेल्या सर्व बाटल्या भरून घेऊन सगळ्यांची तहान भागविली आणि रिकाम्या झालेल्या बाटल्या पुन्हां भरून घेतल्या आणि राहिलेल्या गडाची भटकंती सुरू केली. पुढे गेल्यावर उजव्या बाजूला वाड्याचे अवशेष आहे तर डाव्या बाजूला एक दरवाजा दृष्टीस पडतो. तेथून सरळ पुढे गेल्यावर उजव्या बाजूस दगडात कोरलेली शंकराची पिंड आहे त्याच्याच बाजूला दगडात कोरलेली एक मारुतीचि मूर्ती आहे परंतु ति स्पष्टपणे ओळखता येत नाही. तेथून पुढे तिच वाट एका बुरुजावर जाते. इतकी सगळी भटकंती करून पुन्हां आम्ही गडावर असलेल्या मंदिराजवळ आलो. आणि तिथून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.
दगडात कोरलेली मारुतीचि मूर्ती.दगडात कोरलेली शंकराची पिंड.
माची वरील हनुमंताची पाषाणातिल
मूर्ती.
नंतर सगळेच भराभर वाटा तुडवत वाडीच्या दिशेने निघाले. येव्हाना
सगळ्यांच्या जवळच्या पाण्याच्या बाटल्या संपल्या होत्या आणि सगळेच जण चातक पक्षाप्रमाणे
पाण्याची वाट बघत होते. आता सगळ्यांच्या डोळ्यासमोर फक्त वाडीवर असलेली पाण्याची टाकी
दिसत होती. आणि वेडी वाकडी वळणे घेत सगळ्याची धावपळ सुरू झाली. त्यात सुर्यनारायण आपली
कृपा दृष्टी दाखवतच होते. एकदाचे वाडीवर पोहोचलो आणि सगळा थकवा विसरू सगळ्यांनी पाण्याच्या
टाकीकडे धाव घेतली. सगळे तहान भागउन शांत झाल्यावर दुसरा ग्रूप येण्याची वाट बघत एका
घराच्या ओटीवर देह जमिनीवर लोटला.
तहान भागवून विसावलेले भटके.
उन्हात तहानलेली चिल्लिपिल्लि येव्हाना संध्याकाळचे चार वाजत आले होते. साधारणतः आमच्या तासाभराच्या विश्रांती नंतर आमच्यातलेच चारजण उन्हात धापा टाकत येताना दिसले. नंतर समजले कि हे आमच्या आधीच खालील उतरले होते परंतु जंगल जास्तच आवडल्या मुळे भटकत बसले होते. बराच उशीर होऊन हि दुसऱ्या ग्रूप चा पत्ता नव्हता म्हणून त्यांना फोन करून आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला. पुन्हां एक दीड मैलाची पायपीट होती सगळे जण अंगात त्राण नसल्यासारखे चालत होते. आणि सकाळी ज्या ठिकाणी आम्हाला बस ने उतरले होते त्या ठिकाणी वाडीतली मुले गल्ली क्रिकेट खेळण्यात व्यस्त होती आणि त्यामुळे आमची बस अजून थोडी पुढे नेउन उभी केली होती त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरील भाव बघण्यासारखे झाले होते. एकदाची बस समोर दिसली आणि सगळे निर्धास्त झाले. वाडीतुन येतानाच कुणीतरी कोल्ड्रिंक आणले होते परंतु थकवा घालवायचा असेल तर गरमागरम आल्याच्या चहाची सर कोल्ड्रिंक ला येणार नाही तसेच काहीसे झाले गरमागरम चहाचा घोट मारून सगळे जण पुन्हा तरतरीत झाले आणि राहिलेल्यांच्या वाटेकडे डोळे लाऊन बसले होते. येव्हाना सूर्य सुद्धा आम्हाला सोडून जायच्या तयारीला लागला तरी देखील यांचा पत्ता नव्हता. अंधार पडायला सुरुवात झालि आता मात्र सगळ्यांना विचार पडायला लागले काहीजण मागे जाऊन बघून आले तरी देखील यांचा पत्ता नव्हता. हळूहळू एक एक जण यायला लागले तेव्हा कुठे जिवात जिव आला. सगळे जमा झाल्यावर सकाळी संगितल्या प्रमाणे सगळ्यांना उत्तेजनार्थ प्रमाण पत्र आणि छोट्या ट्रेकर्स ना बक्षिसे देण्यात आली. नवीन ट्रेकर्स चे अनुभव जाणून घेतले.
साधारणतः सकाळी ७ वाजता
सुरू झालेल्या या भटकंतीला रात्री ८:३० वाजता पूर्ण विराम मिळाला.
*काही ट्रेकर्स ने दिलेले
फीडबॅक
१. मला सांगायचं झालं तर,
दुर्गविहार ने मला ट्रेक बद्दल feedback विचारणे म्हणजे घरात आईने "आज भाजी कशी
झाली" अस विचारण्यासारखं आहे। भाजी नेहमी चांगलीच बनते, आणि कधी चुकून तिखट-मीठ
कमी झालंच तरी आईने ती ज्या आपुलकीने बनवलेली असते त्यामुळे ते कळून पण येत नाही।
बाबा खेडकर....
२. Feedback &
Suggestion by Anuja Nesarikar
Hi Kunal,
yesterday's experience was awesome. Looking forward to the next trek
Just few
suggestions, we can start little early at least start the walk by curtailing
time elsewhere.
And you can
mention age and finess criteria or elaborate specifically approx distance of
walk so that people can decide whether to take their kids. Just a
suggestion. Yesterday you really strongly supported Pushkar. Hat's off.
Ur Fitness is too
good.
वेळ काढून वाचल्याबद्द्ल
धन्यवाद........
मनोज म्हात्रे
दुर्गविहार पनवेल.






























sundar varnan
उत्तर द्याहटवा