दुर्ग दुर्गेश्वर रायगड. (भाग पहिला.)

  दुर्गदुर्गेश्वर रायगड.



     रायगड म्हंटले कि आपल्या डोळ्यासमोर उभी रहाते ति हिंदवी स्वराज्याची राजधानी. या पूर्वी आपण सगळ्यांनीच रायगड पाहिला असेल परंतु तीच राजधानी दुर्गविहारने एका सुक्ष्म दृष्टीने दाखवण्याचे ठरवले
     शुक्रवार डिसेंबरची सकाळ उगवली तिच रायगड पहाण्याच्या विचाराने परंतु कामावर जायचे होते म्हणून नाईलाजाने सगळे विचार बाजूला सारुन कामावर जावे लागले परंतु चित्त मात्र कधीच रायगडी पोहोचले होते. एकदाचे कामावरून कधी घरी जातोय आणि बॅग भरून कधी पळतोय असे झाले होते. एकदाची वेळ झाली आणि बॅग पाठीवर मारून आमच्या छोट्या ट्रेकरला हाताशी घेऊन निघालो
    रात्री ११:४५ ची घटका भरली आणि गणपती च्या गजरात आमचा मोर्चा वळाला रायगडाच्या दिशेने. मध्यान्ह रात्र झाली होती म्हणून आमच्यातले बरेच जण वामकुक्षी घेत होते. तर आमच्या गप्पा इतक्या रंगल्या कि महाड कधी आले तेही कळाले नाही. पाचाडच्या घाटात गाडी गोल गोल गिरक्या घेत एकदाची देशमुख हॉटेल जवळ जाऊन पोहोचली सुध्दा. तेव्हा घड्याळात पहाटे चे वाजले होते. मग काय नेहमी प्रमाणे आम्ही कोणाच्या तरी ओट्यावर नाहीतर कोणाच्या तरी अंगणात रात्रभर गप्पांनमध्ये गुंग झालेला देह लोटला. राजकारणाच्या खुर्ची प्रमाणे बाकी सगळे आपली खुर्ची सोडायला सुद्धा तयार नव्हते. सकाळी :३० च्या आसपास सगळ्यांना जागे करून वजन कमी करून नाश्त्याची वाट बघत थांबलो. नाश्ता आटोपून आम्ही रोपवे कडे धाव घेतली.

दिवस पहिला.........
    सकाळी सधारणतः च्या आसपास कुणाल आणि मी दोघांनी रोपवे कडे धाव घेतली. रोपवे वाजता चालू होणार होता आम्हाला वाटले आमचा नंबर आधी लागेल परंतु जवळपास १२५ च्या आसपास आमच्या आधी नंबर होते. जवळ जवळ तासापेक्षा जास्त वेळ आम्हाला थांबावे लागणार होते म्हणून आम्ही पायी जाण्याचा निर्णय घेतला. वाळसुरे खिंडीच्या पायथ्याशी येउन एक छोटीशी ओळख परेड घेऊन खिंडीच्या दिशेने आमचा मोर्चा वळाला. खिंडीची खडी चढण पाहून बऱ्याच जणांना थंडीत सुध्दा घाम फुटला. खिंड चढाईची सुरुवात सगळ्यांनी जोमाने केली परंतु काही वेळाने एक एक गळून पडले. खिंड चढून गेल्यावर ती वाट पुढे चित दरवाजातुन (पायऱ्यांची वाट) येणाऱ्या वाटेला मिळते. पायऱ्याच्या वाटेला लागल्यावर सगळे येण्याची वाट बघत थांबलो

     नंतर एक-दोन-एक करत पायऱ्या वाट मागे टाकत पुढे सरकत होते. गडावर डागडुजीची कामे चालू असल्याने ओझे वाहू गाढवांची खुप मोठ्या प्रमाणात धावपळ चालू होती. गाढवांच्या टापांचा आवाज ऐकायला आला की जीव मुठीत घेऊन कुठे तरी किनाऱ्यावर उभे रहावे लागे. त्यांच्या साठी सगळेजण वाट मोकळी करूनदेत होते.  


कोणी मागे कोणी पुढे करता करता महादरवाज्यात पाऊल ठेवले. महादरवाजाची गोमुखी रचना पाहून आमच्या नवीन इतिहासकारांना (प्रथमेश) रहावेना. मग रायगडाच्या महादरवाज्यात दुर्गविहारचे इतिहासकार आवतरले. आणि गोमुखी रचनेपासून सुरुवात झालेला रायगडाचा इतिहास दुसऱ्या दिवशी नाना दरवाजात संपला. महादरवाजाचि रचना अशी का? याची सुरेख कारणे प्रथमेश ने सांगितली






   महादरवाज्यातून आत गेल्यावर दरवाजाच्या दोन्ही बाजूस देवड्या आहेत. पुढे गेल्यावर उजव्या हातालाहि सैनिकांच्या देवड्या आहेत. दरवाजाच्या वरच्या बाजूस उंचावर एक तुटके टाके निदर्शनास येते ते टाके तिथे असण्याचे कारण म्हणजे शत्रू कधी चाल कारुन आलाच तर ते टाके फोडले जाई आणि त्या पाण्याच्या प्रवाहात शत्रू वाहुन जाई इतके विचार पूर्वक नियोजन त्या काळात केलेले आढळून येते. डाव्या हाताला एक चिंचोळा मार्ग गडावर जातो ते पाहून आम्ही सगळे विचारात पडलो कि किल्ल्याचा दरवाजा इतका भव्यदिव्य आणि पुढील मार्ग इतका चिंचोळा का? पुन्हां एकदा दुर्गविहारच्या इतिहासकारांनी पुढाकार घेतला. समजा कधी शत्रू  महादरवाज्यातून पुढे आलेच तर त्याची कोंडी त्या ठिकाणी केली जाई आणि वरून शत्रूवर हल्ला केला जाइ. पुढे पायऱ्या चढुन वर गेल्यावर दोन तोफा लागतात.



    महादरवाजा पासून डाव्या बाजूला लांब पर्यंत तटबंदी आहे. तटबंदी संपण्याआधी एक बुरूज लागतो त्यात चोर दिंडी बांधलेली आहे. त्या दिशेने जात आम्ही पुन्हां गडावर जाणारी पायऱ्यांची वाट पकडलि. पुढे डाव्या बाजूस एक पोलादी खांब लागतो त्या खांबाला धरून बऱ्याच बखरीनि किंवा लेखकांनी बरेच तर्क लावले. कोणी त्याचा मल्लखांब म्हणून उल्लेख केला तर कोणी हत्ती बांधून ठेवण्याचा खांब. परंतु आमच्या इतिहासकारांनी सांगितले कि ति सूर्यघटिका आहे त्या काळात किती प्रहर झालेला आहे  हे पहाण्यासाठी त्याचा उपयोग होत असे. त्याच्या मागच्या बाजूला मदन शहा नावाचे थडगे आहे त्याला मदार मोर्चा असे म्हणतात. ते पाहून पुढे गेल्यावर लगेचच उजव्या बाजूला हत्ती तलाव लागतो. काहींचे म्हणणे असे होते कि रायगडावरिल हत्ती येथे आंघोळीसाठी येत असत. तलाव पाहून तर असे वाटत नव्हते. हत्ती तलाव कल्पनेप्रमाणे हत्ती सारखाच होता परंतु जवळ जाउन पाहिले तर तलाव पूर्ण पणे कोरडे पडले होते मग असा प्रश्न पडला कि पावसाळा ओलांडून आता कुठे चार महिने झालेत आणि तलाव लगेच कोरडे कसे? तर इतिहासकारांच्या मते हत: म्हणजे मृत: या तलावात पाणी रहात नाही म्हणून याला हत: तलाव असे नाव असावे जे कालांतराने हत्ती तलाव झाले असावे.

      पुढे जाऊन दोन वाटा झाल्या त्यातल्या डाव्या वाटेने आम्ही होळीच्या माळावर निघालो. होळीच्या माळाच्या पलीकडे जाऊन एक पायवाट खालच्या दिशेने उतरते त्या वाटेने आम्ही खाली उतरलो. तर ताई आमची वाट पाहत होत्या. तुम्ही म्हणाल ताई कोण तर ज्यांच्या इथे आमची राहण्याची आणि खाण्याची सुंदर व्यवस्था केली होती. तेथे आपल्या पाठीवरचे ओझे टाकून शांत झालो येव्हाना दुपारचे १२ वाजत आले होते. सकाळचा नाष्टा कधीच जीरला होता आणि खूप भुक लागली होती. तेवढ्यात ताई स्वयंपाक घरातून बाहेर आल्या आणि म्हणाल्या जेवण तयार आहे तर जेउन पुढील भ्रमंति करावी हे ऐकून बरे वाटले कि गरमागरम जेवण मिळणार. सगळ्यांनी पटकन बैठक मांडल्या. वाफाळलेल्या गरमागरम वरण, भात, भाजी, भाकरीवर सगळ्यांनी आडवा हात मारला आणि जेवणामुळे सगळेजण  सुस्थावले. १५/२० मिनिटाच्या आरमानंतर पुन्हां सगळे दुर्ग भ्रमंती साठी सज्ज झाले.

मग आमचा मोर्चा वळाला रायगडाच्या पश्चिम दिशेस असलेल्या हिरकणी बुरजावर ज्या हिरकणी चि कथा आपण सगळेच जाणतो. बुरुजावर जाणारी वाट तशी अवघडच आहे त्यामुळे तेथे शक्यतो कोणी फिरकत नाही. वाटेवर मध्ये पाण्याचे टाके लागतात त्यातील काही टाके अर्धवट खोदलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे बांधकाम करण्यासाठी लागणारा दगड कसा काढला जाई हे त्यावरून दिसून येते. तेथूनच वाट पुढे हिरकणी बुरुजावर जाते. त्या वाटेने आम्ही पुढे वाटचाल केली. बुरुजावर कातळात कोरलेला चपेट मारुती आहे. त्याच्या पायाशी आणि शेपटीत राक्षसीण आहे. बुरुजावर तीन वेगवेगळ्या आकाराच्या तोफा एकाच दिशेला ठेवलेल्या आहेत. कदाचीत त्या आताच्या काळात एकत्र करून ठेवलेल्या असाव्यात.


      ते पाहून आम्ही पुन्हां परतीच्या वाटेने प्रवास सुरु केला. वर चढून येउन पोहोचलो मेणा दरवाजा जवळ. पायऱ्या चढून गेल्यावर मेणा दरवाजातुन आतमध्ये प्रवेश केले असता डाव्याबाजुला राणी वसा म्हणजे राण्यांचे महाल आहेत. महालांची अंतर्गत रचना पाहून आम्ही धान्य कोठाराच्या जवळ येउन पोहोचलो. तेथून पुढे रत्नशाळा, रत्नगृह ही नावे तुमच्यासाठी नवीन असतील कारण तुम्हाला जे नाणे छापण्याचा कारखाना आणि खलबत खाना दाखवला जातो त्या वास्तू नीट निरखून पाहिल्या आणि डोक्याला थोडा ताण दिला तर त्या काळी व्यवस्थापना कशी असावी हे समजतेते पाहून पुढे राजमहालातुन पुढे राजदरबारात प्रवेश केला. जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. तिथे दुर्गविहार च्या इतिहासकारांनि संपूर्ण इतिहास सांगितला. अस म्हणतात राजदरबारातिल कोणत्याही कोपऱ्यात कितीही हळु आवाजात कूजबुज केली तरी तो आवाज सिहासनावर विराजमान झालेल्या महाराजांना ऐकू जायचा. याचे प्रात्यक्षिक आम्ही तेथे करून पाहिले. नंतरआमची वारी नगारखान्या जवळ आली.
     नगारखान्याच्या दोन्ही बाजूस हिंदू धर्मातील लक्ष्मी प्रतीक असलेली कमळाची फुले कोरलेली आहेत. त्याच्या वरच्या बाजूस शरभ (एक काल्पनिक पशू) आहे त्याच्या पायाखाली हत्ती आणि शेपटी मध्ये हत्ती आहे. इतिहासकारांच्या मते ते हत्ती म्हणजे बलाढ्य शाह्या आहे. निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, बिरीजशाही, आणि आदिलशाही या हत्ती येवढ्या बलाढ्य शाह्यानवर विजय प्राप्त करणारी मराठा शाही उदयास आली आहे. असा त्याचा अर्थ इतिहासकारांनि संगितला. नंतर सगळ्यांना वेध लागले ते सूर्यास्ताचे आपल्याला सूर्यास्त कोठून चांगला दिसेल यासाठी सगळ्यांचि धावपळ सुरू होती . मग कोणी बाजारपेठेच्या कोणत्या तरी दुकानाच्या छतावर तर कोणी दुसऱ्या दुकानाच्या छतावर असे सगळे विखुरले होते.

      सूर्यास्त झाल्यावर मग आमची गाडी बाजारपेठ मार्गे जगदीश्र्वर मंदिरात येउन पोहोचली. जगदीश्र्वराचे दर्शन घेइपर्यंत बाहेर अंधार पडला होता. तेथून पुढे पाय वळले महाराजांच्या समाधी कडे. समाधीचे दर्शन घेऊन मागे  वळलो कि उजव्या बाजूच्या भिंतीवर एक शिलालेख कोरलेला आहे. हा शिलालेख संस्कृत मध्ये असल्याने सगळ्यांना सहजासहजी वाचता येत नाही त्यामुळे दुर्गविहार चे जुने जाणते इतिहासकार कुणालने सगळ्यांना शिलालेखाचे वाचन करून त्याचा सारांश मराठीत समजून सांगितला. दिवस भराच्या धावपळीने सगळेच थकले होते त्यामूळे शिलालेखाचे वाचन चालू असताना जणू आपण कीर्तनाला बसलोय याप्रमाणे डुलकी देत होते तर काही मन लाऊन शिलालेखाचे वाचन ऐकत होते

शिलालेख वाचन झाल्यावर परतताना पावले अचानक जगदिश्वराच्या पायरी जवळ आडखळली ज्याठिकाणी हिरोजी इंदूलकर यांनी संपूर्ण रायगड घडवला आणि आपले नाव जगदिश्वराच्या पायरीवर कोरून ठेवले आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदूलकरतिथून मग थकलेली पावले ताईच्या घराकडे वळली

आम्ही पोहोचायला तर गरमागरम जेवण तयार होतेपटकन थंडगार पाण्याने दिवसभराचा थकवा घालउन जेवायला बसलोपोटभर जेवण झाल्यानंतर सगळ्यांनी झोपण्यासाठी आपापली जागा पकडलीआम्ही / डोकी निघून स्टार गेझिंग करण्यासाठी बाहेर पडलोस्टार गेझिंगसाठी जागेच्या शोधात आम्ही नगारखान्याच्या समोरील कातळावर येउन पोहोचलोतिथे लोटांगण घालत तुटणारे तारे बघत बसलोतुटणारे तारे बघता बघता मि मंगळावर कधी पोहोचलो हे कळलेच नाहीमंगळावर पाऊल ठेवणार तेवढ्यात कानाजवळ जोरदार शिट्टी चा आवाज आला आणि मग कळले कि तारे बघता बघता  मला निवांत झोप कधी लागली हे कळलेच नाहीरायगडावर रात्री फिरायला परवानगी नाही त्यामुळे इथे थांबूनका अस रात्री गस्त घालणारे काका आम्हाला सांगत होतेतिथून आमची पालखी पुन्हां ताईच्या घराकडे वळलीतोपर्यंत रात्रीचे १२ वाजले होतेतोपर्यंत सगळ्याच्या आर्ध्या झोपा झाल्या होत्यामग आम्ही सुध्दा दिवसभरात थकलेला देह जमिनीवर लोटला.

                                                                        क्रमशः
दुसरा भाग पहाण्यासाठी येथे क्लिक करा.
दुर्ग दुर्गेश्वर रायगड. (भाग दुसरा.)





टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट