किल्ले पद्मदुर्ग


किल्ले पद्मदुर्ग



    ट्रेक ठरवायचा झाला की आयोजकांची ठिकाण ठरवण्यापासून धावपळ चालू होते ति ट्रेक सुखरूप संपेपर्यंत चालूच असते. तशीच आमची सुद्धा धावपळ सुरू झाली. खरतर या आधी हि किल्ले पद्मदुर्ग ट्रेक लावण्याचा विचार केला होता. परंतु या आधी पद्मदुर्ग पाहण्यासाठी परवानगी लागायची कारण तिथे कस्टम चा बेस असल्याने तिथे जाण्यास परवानगी नसायची. परंतु आता बेस काढल्या मुळे पद्मदुर्ग पाहण्यासाठी सगळ्यांना खुले केले आहे. मग काय दुर्गविहार ची पुन्हां तयारी चालू झाली. आणि मग सगळी धावपळ चालू झाली. तारीख ठरवण्या पासून ते बोट ठरवण्या पर्यत.परंतु बोटीतून जाण्यासाठी प्रवासी मर्यादा असल्याने दुर्गविहार वर पण ट्रेकरच्या प्रवेशाची मर्यादा आली. परंतु ट्रेकर चा उत्साह पहाता बऱ्याच जणांना नाही सांगणे शक्य झाले नाही आणि नाईलाजाने आम्हाला दुसरी तुकडी बनवावी लागली.
 पहाता पहाता १८ नोव्हेंबर उगवला आणि सूर्य नारायण उठण्या आधीच आम्हाला उठावे लागले. आणि जाण्यासाठीची 
धावपळ सुरू झाली. ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो तर आमच्या आधी बऱ्याचश्या उत्सुक मंडळीनी हजेरी लावली होती
नेहमी प्रमाणे सकाळी  :४५  वाजता निघायचे होते परंतु सगळे जमता जमता कधी  :३०  वाजले समजले नाही आणि 
सगळे जमेल एकदाचे
   गणपतीच्या जयघोषात ट्रेक चि सुरुवात झाली. सकाळी लवकर घर सोडल्याने गाडी चालू झाल्या झाल्या बऱ्याच 
जणांनी वामकुक्षी स्वीकारली तर काही जणांनी मोबाईल ला आपलेसे केले आणि आमच्या सारख्या डोंगर भटक्यांच्या 
गप्पा रंगल्या. प्रवास लांबीचा असल्याने बऱ्याच जणांचे चेहरे केविलवाणी झाले होते. नेहमी पेक्षा वेळ खूप कमी आणि 
प्रवास खुप जास्त होता त्यामुळे जिथे जिथे वेळ वाचवता येइल तिथे तिथे वेळ वाचवण्याचा पूरेपूर प्रयत्न केला होता
पनवेल वरून गाडी निघाल्यानंतर गाडीत बसून बरेच जण जड झाले त्यानां हलके होण्यासाठी गाडी रेवदंड्याच्या एसटी 
बस स्टँड मध्ये थांबली. या वेळी नाष्टा सोबत  असल्यामुळे आम्ही नाष्टा हि बस स्टँड मध्येच उरकून घेतला आणि पुन्हां 
पुढील प्रवास सुरू केला. कितीही वेळेची बंधने घातली तरी काही ना काही कारणाने उशीर होतोच. तसेच काहीसे आमच्या 
सोबत घडले आणि ११:३० ला पोहोचता पोहोचता १२:३० होऊन गेले. होडीवाले मामा बिचारे फोन करून दमले. एकदाचे 
आम्ही पोहोचलो तर मामा आम्हाला बस पर्यत न्यायला आले होते कारण ओहोटी लागली होती पाण्याची पातळी कमी 
होत चालली होती. त्यामुळे बोट वाळूवरुन निघणे कठीण झाले असते म्हणून त्यांची घाई चालू होती. बस मधून सगळे 
उतरून  येइ पर्यत मामा क्षणाचा ही विलंब लावत पहिली तुकडी घेऊन गेले सुद्धा.

पहिल्या तुकडीला सोडून येइपर्यंत बाकी राहिलेल्या ट्रेकर कडे थोडा वेळ आराम होता त्या संधीचा फायदा घेत 
आमच्यातले काही महाभाग जेवण घेऊन येतो सांगून गेले आणि तिथेच जेवणावर ताव मारत बसले.  इकडे 
मामाआम्हाला नेण्यासाठी पुन्हां आले सुद्धा तरी या महाभागाचा पत्ता नव्हता. एकदाचे धावत पळत आले आणि आमचा 
मोर्चा गडाच्या दिशेने वळाला.

                                  बोटीचे नेतृत्व करणारी मनोज्ञा

     साधारण १५ ते २० मिनिटामधे आम्ही गडावर पोहोचलो तोपर्यंत पहिल्या तुकडीचे गड दर्शन चालू होते.

इतिहासकार गडाचे सहा बुरूज आणि तटबंदी चा इतिहास सांगत होते. आम्ही ही त्यांच्यात सामील होउन 

पुढील किल्ला जाणून घेण्याचि सुरुवात केली.
    आमचा मोर्च्या वळाला पडकोटच्या दिशेने. पडकोट आणि पद्मदुर्ग यांच्या मध्ये खूप सा-या शंख-शिंपल्याचा खच पडला 
होता. इतिहासकारांच्या मते हा सुनामी च्या वेळेत आला असावा. तिथून पुढे गेल्यानंतर पडकोटाचि पडक्या अवस्थेत 
थोडीफार तटबंदी शिल्लक आहे. त्या तटबंदीच्या बाजूने भटकत भटकत पडकोटाच्या आतील मंदिरा जवळ पोहोचलो
मंदिराच्या भिंती अर्धवट पडक्या अवस्थेत आहेत. मंदिराच्या समोरील बाजूस एक पाण्याचे टाके आहे.
                  
जन्मताच ट्रेकिंग चे बाळकडू प्यायलेले आमचे छोटे ट्रेकर मिहीर.

        
               देवीचे मंदिर

ते पाहून होईपर्यत पहिल्या तुकडी ला नेण्यासाठी मामा आले होते. आमचा निरोप घेउन पहिली तुकडी परतीच्या प्रवासाला 
निघाली. सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली होती त्यामुळे पोटपुजा उरकून घेतली आणि पद्मदुर्ग 
पाहायला सुरुवात केली.


 पद्मदुर्ग किल्ल्याच्या सहा बुरुजांच्या वेगवेगळ्या आकारमानावरुन बुरुजांचे महत्त्व दुर्गविहार चे इतिहासकार 
सगळ्यांना पटउन सांगत होते. बुरुजाच्या चर्र्यांना कमळाच्या पाकळ्र्यांसारखा आकार दिलेला आहे. सर्व बुरुजांवर 
किल्ल्याच्या चहुदिशांना तोफ ठेवलेल्या आहेत जणू काही त्या तोफा आज ही किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी झटत आहेत.
किल्याच्या मुख्य द्वाराने आत आल्यावर सैनिकानसाठि दोन देवड्या आहेत तेथुन पुढे आल्यावर उजव्या हाताला तिन 
हौद आहेत. त्यांचे बांधकाम पाहता एकतर ते डागडूजी केलेले असावेत किंवा शिवकालीन नसावेत. हौदाच्या मागे बुरुजात 
खालच्या बाजुस दोन कोठ्या आहेत. त्याचे बांधकाम थोडे फार मुघल शैलीशी मिळते जुळते आहे. हे सर्व पाहून होत नाही 
तोच आमची चंद्रभागा आम्हाला घ्यायला हजर झाली. चंद्रभागा म्हणजे आमचा सागरी प्रवास सुखकर करणारी आमची 
होडी. आम्हाला घेतल्यानंतर चंद्रभागा हवेत धूर काढत आम्हाला सुखरूप किनाऱ्यावर घेउन आली.
                                                        हौद

किल्ल्याचे दगड झिज होउन शिल्लक राहिलेले बांधकाम

                          
   
      मुघल शैलीशी मिळते जुळते बांधकाम

आमचा सागरी प्रवास  सुखरूप करणारी  चंद्रभागा.

अखेरचा हा तुला दंडवत.
      
 मग तीथून पुढे लांबच लांब बस चा प्रवास सुरू झाला. लांबचा प्रवास आणि रात्र झाल्याने थेट मुरुड ते पनवेल 
अंतर थांबता कापले....... 

                                                                       धन्यवाद
                                                                       मनोज म्हात्रे
                                                                        दुर्गविहार ...

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट