किल्ले मृगगड



    ट्रेक घेउन जायच म्हटल कि त्या आगोदर खुपसाऱ्या उठाठेवी कराव्या लागतात. परंतु सगळ्यांना श्रावण सुरू होण्याचे वेध लागल्याने हि सगळी जबाबदारी कुणाल आणि माझ्या खांद्यावर आली.
       म्हणतातना श्रावण पाळणारा एक आणि सोबत खाणारे दहा काहिसा अश्यातलाच प्रकार असावा

    अखेर दोघे पाहणी करून आल्यावर १९ ऑगस्ट ला ट्रेकचा मुहूर्त ठरला. आधी २५ जणांनाच सहभागी होता येणार होते. परंतु उस्पुर्त प्रतिसाद पाहता नावांची यादी थोडी लांबलिच
 १९ ऑगस्ट उगवला आणि ट्रेक ला जाण्यासाठीचि धावपळ सुरू झाली. सकाळी :४५ ला पनवेल बस स्थानक जवळ रिपोर्टींग होते. आम्ही पोहोचण्या आधीच एक एक जण जमायला सुरुवात झाली होती. साधारण :२० च्या आसपास सर्व जमा झाले. आणि मोर्चा वळवला पनवेल रेल्वे स्टेशन कडे. तिथे काही महाभाग आरामात चालत येत होते आणि आम्ही चातका सारखी त्यांची वाट बघत होतो.
    सर्वजण आल्यावर गणेशाच्या जयघोषात पुढील प्रवासास सुरुवात झाली. पनवेल मधून बाहेर निघाल्यानंतर हिरवीगार शाल पांघरलेले डोंगर आणि त्यांच्या कुशीतुन वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे लक्ष वेधून घेत होते. पुढे प्रबळ माची आणि त्याच्या मागून डोके वर काढून माझ्याकडे कोणी येतय का ते पाहणारा कलावंतिण दुर्ग लांबूनच आपले दर्शन देत होता. इरसाळ गड जणू आपले दोन्ही हात वर करून आपल्या जवळ असलेल्या नेत्राने (इरसाळ वर असलेले नेढे) जणू आम्हाला खुणावतोय. असा सगळा सुखकर प्रवास करुन आम्ही खालापूर ला पोहोचलो. आणि तिथून पुढे आमचा बस मधुनच होडीचा प्रवास सुरू झाला आणि जमेल तिथे झोपणे हा छंद असणारे सगळे जागे झाले. सकाळी लवकरच घर सोडल्यामुळे प्रचंड भुक लागली होती त्यामुळे एकएका च्या ब्यागेतुन काहीना काही बाहेर निघुन पोटाची खळगी भरत होते. साधारणपणे सकाळी :१५ च्या सुमारास आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या भेलिव गावात पोहोचलोप्रचंड भुक लागलेली असल्याने सगळ्यांनी नाश्त्याकडे धाव घेतली. मनसोक्त नाश्ता झाला आहे याची खात्री करुनच एकएक जण बाहेर पडत होते. कुणाल आणि मी तर बाहेर उभ राहून प्लेट हातावर घेऊनच आमचा नाष्टा उरकला.
    प्रथेप्रमाणे हमी पत्रक भरून घेण्याचे काम चालू झाले. ती पत्रके अशा प्रकारे भरत होते जणू यांचा बोर्डाचा पेपर आहे.
   परीक्षेची पूर्व तयारी
 हे सगळे उरकून पुढील वाटचाल सुरू केले. नेहमी प्रमाणे प्रत्येक ट्रेक ला कोणी ना कोणी तरी नवीन असतात त्यामुळे नेहमीप्रमाणे एक छोटीशी ओळख परेड झाली


प्रत्येक ट्रेकला आमची एकच छोटी ट्रेकर असायची परंतु या वेळी तिचाही रेकॉर्ड मोडून दुर्गवीहार च्या भावी इतिहासकाराने अवघ्या ११ महिन्यात हजेरी लाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

                                                          दुर्गविहार चे छोटे इतिहासकार

 कुणालने सर्वांना माहिती वजा सूचना देउन ट्रेक चा श्री गणेशा करण्यात आला.  
    गडाची वाट आम्हा दोघांनाच माहिती असल्यामुळे मी वाटाड्याचि भूमिका स्वीकारली तर नेहमी प्रमाणे शेवटी उरलेल्यांना घेऊन येणारा प्रथमेश नसल्याने त्याची जागा कुणाल ने घेतली. गडावर जाणारी वाट जंगलाची असल्यामुळे वाट चुकण्याची दाट श्यक्यता होती परंतु गड संवर्धन करणाऱ्या दुर्गवीर संथेने सर्वत्र दिशादर्शक फलक लावले आहेत.
जंगलाची वाट पायदळी तुडवत मधेच कुठेतरी एक लहानसा ओढा लागे त्यात असणारे खेकडे आम्ही येण्याची चाहूल होताच आपले डोळे मिटून लपून जात जणू आमच्यात लपंडाव चालू आहे. रंगीबेरंगी बेडकांना तर आम्ही नकोसे झालो होतो. त्यांनी देखील विचार केला असावा कि या माणसांनि आधीच आमचं जग छोट केलाय. आणि आता इथे येउन सुध्दा त्रास द्यायचा सोडला नाही. या सगळ्याची मज्जा घेत आम्ही घळीच्या उजव्या बाजूला असलेल्या गुहेपाशी पोहोचलो.


             
अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या घळीचा कोणालाही अंदाज नव्हता. अचानक घळी समोर दिसल्यावर काहिनी आपल्या उंचीचा पूरेपूर वापर करत घळी पार केली. परंतु ज्यानां आपल्या उंचीचा वापर करता आला नाही त्याच्यासाठी दुकानांच्या दरवाज्या वरचे दोन शब्द उपयोगी पडले पूश आणि पूल. घळी चढल्यावर सगळ्यांनीच सुटकेचा श्वास घेतला.

                          दमछाक करणारी घळी


         तोच लगेचच समोर कातळात कोरलेल्या पायऱ्या समोर उभ्या ठाकल्या पावसामुळे पायऱ्या खूप च निसर्ड्या झाल्या होत्या आणि त्यातच श्रावण सरी आमच्यावर बरसत होत्या. एकाने तर चक्क चप्पल घालून ट्रेक ला हजेरी लावली होती आणि मग पायऱ्या चढताना बिचारा गळपटला आणि अरध्यातून कसा बसा खाली उतरला.


निसर्डी पायऱ्याचि वाट 

    एवढी सगळी कसरत करून गडावर पोहोचलो आणि आजूबाजूचा परिसर बघून साक्षात स्वर्ग अवतरल्यासारखे वाटत होते. हिरवळीने नटलेला उंबर खिंडीचा परिसर, बाजूला टायगर व्हॅली, तर एका बाजूला वाघदरी, आपले लक्ष वेधून घेतात. हा सगळा सौदर्याने नटलेला परिसर डोळ्यात सामाऊन आम्ही गडाच्या दुसऱ्या बाजूला आलो तर आंबा नदी जणू आमच्या स्वागतासाठि वेडी वाकडी वळणे घेत वाहत होती.

                                    गुफेतुन दिसणारे अप्रतिम दृश्य


                                                           रंग माझा वेगळा


                                                                                           हि वाट दुर जाते


 हे सगळ पाहून झाल्यावर वेळ आली गडाचा इतिहास जाणून घेण्याची. आणि आमचे दुर्गविहार चे इतिहासकार गडावर अवतरले
इतिहासाला उंबर खिंडीच्या लढाई पासून सुरुवात झाली ति थेट कारतलब खान च्या पराजयानंतर थांबली. तुंगारण्यातली ती लढाई सगळे शांतपणे ऐकत होते.
लढाई संपेपर्यंत आम्हाला दुपारचे :४५ झाले होते. मग आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आणि अचानक श्रावणातला पाऊस संपून भाद्रपदातला पाऊस सुरू झाल्यासारखे पावसाने आम्हाला झोडपले. पावसामुळे उतरताना सगळ्यांचि तारेवरची कसरत चालू होती. आणि माझी माझ्या  सोबत असलेल्या छोट्या ट्रेकर्स ना खाली उतरवण्यासाठीची धडपड चालू होती. घळीतुन या सगळ्यांना सुखरूप उतरून यांचा निरोप घेतला आणि मग दुर्गविहार टिम चि बाकी सगळ्याना सुखरुप उतरवण्यासाठी धडपड चालू झाली
नेहमी राहिलेल्यांना घेऊन येणारा प्रथमेश यावेळी नसल्यामुळे त्याची भूमिका मी घेतली. आम्हाला पायथ्याशी पोहोचायला जवळपास वाजले होते. जवळजवळ सगळ्यांचे जेवण आटोपले होते. आम्ही सुध्दा जेवण आटोपून लगेच बस कडे धाव घेतली. आणि पुन्हां एकदा होडीचा प्रवास चालू झाला..........
अशा या अविस्मरणीय ट्रेक साठी दुर्गविहार चे मनापासून आभार.........


                                                                 दुर्गविहार टीम


                                    धन्यवाद.....

                                    मनोज म्हात्रे 
                                     दुर्गविहार

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट