घेरा सुरगड….......

                        

खुप महिन्यापासून दुर्गविहार ने घेतलेल्या विश्रांती ला एकदाचा पूर्णविराम लागला.
       पावसाळ्यातिल बाईक ट्रेक साठीचि हालचाल सुरू झाली. ट्रेक साठी ठिकाण ठरवण्या पासून ते 

किती बाईक एंट्री घ्यायची इतपरियंत सर्व हालचालींना  सुरुवात झाली. आणि ट्रेक ठरला रायगड 

जिल्ह्यातील सुरगड. ट्रेक नेण्याआधी आमचे दुर्गविहार चे दोन इतिहासकार कुणाल आणि प्रथमेश 

गडावर जाणाऱ्या वाटा आणि गडाचि पहाणी करून आले होते. त्यामुळे गडावर भटकत रहाण्याची 

भीती नव्हती.

    ट्रेकच शेडुल आल त्यात ३० जण आणि १५ बाईक यापेक्षा जास्त एंट्री नव्हती. म्हणून उत्सुक 

मान्यवरांनि आपली नावे त्वरित नोंदविलि. मला सहकुटुंब जायचे होते त्यामुळे कोणाच्या बाईकचि 

वाट बघण्याची गरज नव्हती. ठरल्या प्रमाणे १५ बाईक आणि २७ एंट्री आल्या. 

   ट्रेक चा दिवस उगवला आणि आमची धावपळ सुरू झाली कारण आमच्या सोबत नविन खेळाडू 

होती. आमच्या छोट्या ट्रेकर ने तिला आता पर्यंत च्या सगळ्या ट्रेकचि नियमावली माहिती १० 

वेळा तरि ऐकून दाखवली असेल

   सकाळी .३० रिपोर्टींग टाईम होत परंतु मला घरातून निघायला उशीर झाला. ठरलेल्या 

ठिकाणी आलो तर आमच्या आधी बरेचजण हजर होते. तिथे पोहोचल्यावर समजले कुणाल येत 

नाही. मग सगळी सूत्रे आमच्या हाती आली. प्रथमेश कडून पुढील माहिती घेऊन ट्रेकचि सुरुवात 

करण्याचे ठरविले. पुढे कोणत्या बाईक लीड करतील आणि शेवटी राहिलेल्याना कोण गोळा करून 

आणेल हे सगळे ठरउन आम्ही ट्रेक चि सुरुवात केली. ठरल्याप्रमाणे सगळ्यांच्या बाईक मध्ये 

पेट्रोल भरून पुढील प्रवास सुरू केला.






          पहिला टप्पा गाठून १०.३० च्या सुमारास सर्व बाईक नाष्टा करण्यासाठी थांबल्या. भरपेट नाष्टा केला.
ठरल्याप्रमाणे सर्व वेळेवर होते. दुसऱ्या टप्याचि घोडदौड साधारण तासाभराचि होती. बाईक ट्रेक 

-आणि बाईक पंचर किंवा बंद नाही पडली तर तो बाईक ट्रेक लक्षात कसा राहणार. तसच काहीसे 

आमच्या सोबत दुसऱ्या टप्प्याच्या सुरवातीला घडले. आणि आमचे वेळेचे घड्याळ आमच्या पुढे 

धाऊ लागले. मागच्याना गोळा करून घेऊन येणाऱ्याचि कसरत चालू झाली. मग आम्ही पुढे जाऊन 

वाकण फाटा येथे सगळे येण्याची वाट बघत थांबलो. तिथे सगळे आल्यानंतर पुढील प्रवास 

सुरू झाला.
  
  माझी बाईक लीड करत असल्यामुळे  मला मधेच आरशातुन मागे येणाऱ्या बाईक वर लक्ष ठेवावे 

लागत असे. असच एकदा आरशात मागे बघत असताना अचानक माझ्या मागच्या बाईक वरचे 

खड्ड्यात आदळून पडले. सुदैवाने जास्त काही झाले नव्हे. मग आम्ही सगळे पुन्हां पुढील प्रवासाची 

सुरुवात केली. आणि त्यात आमच्या इतिहासकाराने अचानक आम्हाला भेट दिली आणि आमच्या 

सोबत ट्रेक साठी सामील झाले.

   थोड्याच वेळात आम्ही खांब गावात पोहोचलो. तेथून पुढे घेरासुरवाडिला जाणारी ति हिरवीगार 

वळणाची वाट मनाला सुखद आनंद देणारी होती. वाडीत असलेल्या हनुमान मंदिराच्या समोर 

आम्ही आमच्या बाईक ठेवून सगळ्यांचि ओळख परेड झाली. मग आमच्या दोन्ही इतिहासकारांनि 

गडाचे महत्त्व आणि गडाचि माहिती सांगून आम्ही ट्रेक ला सुरुवात केलि






  सुरुवातीलाच एक छोटासा ओढा लागतो. ओढा पार केल्यानंतर लगेचच एक विहीर लागते. विहीर 

मागे टाकल्यानंतर जंगलातुन जाणारी पायवाट गडावर घेऊन जाते. पहिला टप्पा पार केल्यानंतर 

एक पठारी भाग येतो. तिथे दोन मिनिटे विश्रांती घेऊन पुन्हां मोर्चा गडाच्या दिशेने वळवला. वाटेत 

एका फलकावर दाखविल्याप्रमाणे एक रस्ता अणसाई देवीच्या मंदिराकडे जातो तर दुसरा गडाच्या 

दिशेने जातो. येथून सुरगड किल्ला आणि त्याचे दोन बुरुज न्याहाळता येतात. नंतर हि वाट 

दगडातून जाणारी असल्यामुळे नवीन ट्रेकर चि कसरत चालू होती. ति कसरत करता करता 

अचानक समोर अभेद्य असा काळा खडक समोर उभा ठाकला.








     गडावर जायचे तर हा खडक पार करूनच जावे लागणार होते. परंतु पावसामुळे वाट खूपच 

निसर्डि झाली होती. हे कसे पार करायचे असा विचार बऱ्याच  जणांच्या मनात आला. तो पर्यंत 

आमच्या छोट्या ट्रेकर ने तो खडक पार सुद्धा केला. हळूहळू सर्वांनी हा कातळ पार करून गडावर 

प्रवेश केला.




            तेथे सुरुवातीलाच  उजव्या बाजूला एक हनुमानाची मुर्ती आहे. मिशी आणि कमरेला खंजीर 

असलेली ही हनुमानाची मूर्ती असून त्याने पायाखाली कैदासिण राक्षसीणीला चिरडलेले आहे

हनुमानाचे शेपूट माथ्यावर आहे. मास्र्ती स्तोत्रातीलपुच्छते मुरडिले माथाया ओळीची येथे 

आठवण होते. अशी माहिती दुर्गविहार च्या इतिहासकाराने दिली.


     मारुतीचे दर्शन घेउन पुढे गेल्यावर एका माचीवर पोहोचतो. तिथून कुंडलिका नदीचे पात्र 

निदर्शनास येते. तेथून डाव्या बाजूने पुढे गेल्यास पाशाणात कोरलेल्या कहि मूर्ती आणि पिंड 

निदर्शनास येते. तेथून पुढे गेल्यावर एकमेकांना लागून पाण्याची टाकी आहेत परंतु त्यातीलपाणी

हे पिण्यायोग्य नाहीतेथून पुढे खाली उतरल्यावर उजव्या बाजूला शिलालेख पडलेल्या अवस्थेत 

असून त्यावर भाषांमध्ये माहिती कोरलेली आहे, वरच्या बाजूला अरबी भाषेत ज्या ओळी 

लिहिल्या आहेत त्याचच भाषांतर खाली देवनागरी मध्ये केलेलं आहे. पुढे शेवटचा ढालकाठी बुरूज 

लागतो.






 तो पाहून आम्ही परतीच्या प्रवासास लागलोपरंतु पावसाने उघड टाकल्याने आम्हीदुपारचे

जेवण आटोपून घेण्याचा निर्णय घेतला कारण सकाळचि मिसळपाव केव्हाच संपून खुप भुक लागली होती.

     सगळ्यांचे डबे पाहून दुपारचे जेवण आहे कि सकाळचा नाष्टा याचा विचारा पडला. मस्त भरपेट 

जेवण करून आम्ही परतीच्या प्रवासाची सुरुवात केली.

पुन्हां गेल्या वाटेने परत यायचे होते. आणि अचानक आम्हाला पुन्हां पावसाने गाठले. पावसामुळे 

वाट निसरडी झाली होती त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनात कातळ कड्याची भीती निर्माण झाली 

होती. परतीच्या प्रवासाची आमचि गाडी कातळ कड्याजवळ येउन थांबली. आता उतरायचे कसे 

असा विचार बऱ्याच जणांच्या मनात चालू झाला. वाट निसरडी झाल्याने सगळ्यांना निर्विघ्न 

खालील उतरवणे हि एक जोखीमच होति.


हळूहळू एक एक करून सगळे खाली उतरले आणि पुढे मार्गस्थ झाले. बाईक ठेवलेल्या ठिकाण 

येउन नेहमी प्रमाणे एक ग्रूप फोटो झाला


   लगेचच सगळ्यांनि बाईक काढून घरची वाट धरली आणि एका मागे एक सगळ्या बाईक 

निघाल्या. पाऊस, चहा आणि कांदा भाजी यांच एक अनोख नात आहे. त्यामुळे पाऊस तर आमच्या 

जोडीला होताच आवश्यकता होती ति बाकीच्या दोन गोष्टींची. आणि म्हणून आम्ही मध्ये वाकण 

फाट्याजवळ थांबून मनसोक्त चहा आणि कांदा भाजी चा आनंद घेण्याचे ठरवले. त्यातच 

आमच्यातल्या कोणाची तरी बाईक खराब झाली आधीच आम्ही वेळेच्या मागे धावत होतो त्यात 

आजून उशीर. मग कुणाल ने मला सांगितले तु जेवढे आहेत त्यांना घेऊन पुढे जा आम्ही नंतर 

येतो

   सगळ्यांना पुन्हां सूचना देउन आम्ही निघालो. पाऊस चालूच होता. आमचा ट्रेक संपत आला 

तरी बाईक मध्येच बंद पडण काही थांबत नव्हे. अशीच आमच्या पैकी एकाचि बाईक रस्त्यात बंद 

पडली तिला कसतरि दे धक्का करून चालू केली. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा पाऊस आमच्या 

पाठीशी होताच.

     सालाबादा प्रमाणे या वर्षीहि सरकारने रस्त्याचि कामे भर पावसात सुरु केल्याने सागळ्यांचा 

प्रवास होडीतुन चालू आहे असे भासत होते. देश जरी मेक इन इंडिया च्या पाठीशी असला तरी 

आमचे रस्ते मात्र मातीने भरले जातात आणि त्यामुळे भर पावसात रस्त्यावर आणि रस्त्याबहेर 

सगळीकडे सागरी मार्ग तयार झालेले असतात

    या सगळ्यातुन कशीतरी वाट शोधत पुढे आलो. आंधार हि झाला होता त्यामुळे रस्ता अस्पष्टच 

दिसत होते. त्यात पाऊस मदतीला होताच

  आमचे बरेच पायलट डबल ब्याट्रि असल्याने त्यांचे तर वांदे झाले होते. त्यामुळे माझ्या 

सोबतच्या सगळ्याच बाईक बऱ्याच मागे राहिल्या होत्या. रस्ता भयाण शांत असल्याने 

मागच्यांची वाट बघत थांबाणे हि शक्य नव्हे. त्यामुळे आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला

खोपोली रोड ला आल्यावर वाहनांचि वर्दळ दिसू लागले तेव्हा कुठे बरे वाटले

    रात्रीचे .३० पर्यंत पनवेल गाठले. ट्रेक च्या शेवटच्या टप्प्यात घरी पोहोचल्यावर मेसेज 

टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या परंतु कदाचीत कोणीही पोहोचले नव्हते. रात्रीचे १०.३० नंतर एक 

एक बाईक पोहोचल्याचे मेसेज येउ लागले ते रात्री १२.४५ पर्यंत चलूच होते.

       गड चढताना आणि उतरताना कसरत कमी. त्यापेक्षा येताना बाईक चालवणाऱ्याचि तारेवरची 

कसरत जास्त होती.

       अशा या अविस्मरणीय ट्रेक बद्दल दुर्गवीहार चे मनापासून आभार...................

        असेच ट्रेक नेत रहा. आणि सुट्टी कमी घ्या...........................
                                                
                                             धन्यवाद.
                                                
मनोज म्हात्रे.
                                                
दुर्गवीहार पनवेल.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट