"सह्याद्री" माझा प्रियकर
'सह्याद्री' सह्य- अद्री. नावातच आधार सामावलेला आहे. अन जेथे आधार तेथे जिव्हाळा आलाच. महाराष्ट्राच्या मातीत जन्म झाला, यातच मी माझं भाग्य मानते. त्यात सह्याद्रीशी नातं निर्माण झालं, तेव्हा तर भरून पावले....!!!
मला सह्याद्री प्रियकरासारखा वाटतो....जसा प्रियकराचा सहवास हवाहवासा... त्याचे रोजचे भेटणेही कायम नव्याने भेटल्यासारखे वाटते.... अन ज्याचा विरह प्रचंड ओढ लावणारा असतो.... तसा माझा 'सह्याद्री' हवाहवासा..त्याच्या ओबडधोबडपणातही सौंदर्य , त्याच्या राकटपणात प्रेम दडलयं....सह्याद्रीत हिंडताना एक आधार , एक जिव्हाळा , एक कौतुक वाटते...जेवढे न्याहाळू, डोळ्यात भरू, मनात साठऊ तेवढे कमी वाटते...
सह्याह्रीच्या पर्वतरांगांवर हिंडण्यासाठी निघताना लागणारी ओढ विलक्षण असते.... अन त्याचा विरहही तसाच हुरहुर लावणारा.. कधी डोळ्यात पाणी आणाणारा.. तर कधी पुढच्या भेटीची ओढ लावणारा असतो. ....

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा