कोथळीगड़ (पेठ चा किल्ला)
तसा मुंबई पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला हा छोटेखानी किल्ला नवोदित
डोंगर भटकुंचा तसेच पारंगत गिर्यारोहकांचा ठेवणितला किल्ला!!
गिरिदुर्ग प्रकारात मोडणारा हा किल्ला कर्जत-भीमाशंकर या डोंगर रांगेत येतो.
कर्जत पासून तासाभराच्या अंतरावर अंबिवली हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव.नेहमी
ट्रेक्स ना जाताना दुरून खुणावणारा हा पाषाण पुरुष पाहण्याचा ठरला तो श्रावण
महिन्यात, खरच कवीने म्हणले तसे चोहिकडे
हिरवळ, झरे, पशु पक्षी आणि आमच्या सारखे काही उनाड भटके. सकाळी
पाचच्या टोल्याला घर सोडले आणि दादरहुन लोकल पकडून कर्जतकड़े कुच केली, लोकलच्या गर्दीत शोधत येउन भेटत होते ते काही
नविन सवंगडी, शेवटी कर्जत आले आणि तिथे आमचे पनवेलकर बस
घेउन वाट पाहत होते, नाही नाही म्हणता
आम्हा 30 जणांची टोळी अंबिवली
गावत पोहोचली. घरून निघालेल्या रिकाम्या पोटात गरमा गरम मिसळ पाव आणि वाफाळलेला चहा जाताच
सगळे तरतरित झाले. परंपरेनुसार ओळख परेड उरकली आणि पेठेच्या दिशेने पायपीट सुरु
झाली. वाटेत जाताना कार्विचे फुललेले रान,
मधेच कुठून चाहुल देणारे पक्षी, मंद वाहणारे झरे आणि पावलागणित जवळ येणारा
किल्ला.
पायऱ्या चढून वर जाताना कळतही नाही की पोटात सुन्दर असा दरवाजा दडवलेला आहे,
दरवाज्याच्या उजव्या बाजुस शरभ शिल्प आणि
गजशिल्प पाहून गडमाथ्यावर प्रवेश केला. प्रवेशद्वारातून आत शिरताच वर छोटेसे तळे
आहे, गडमाथा आटोपता असल्याने
वर फार काही पाहण्यासारखे नाही पण वरून प्रबळगड, माथेरान, चंदेरी, सिद्धगड, माणिकगड, पदरगड, नागफणी असा प्रचंड मुलुख पाहता येतो. वरचे
विलोभनीय दृश्य आणि वाऱ्याने थकवा उडवून लावला. पाउस आणि भूक यांनी भानावर आणले तसे आम्ही खाली
गुहेकडे निघालो,

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा