अकोलेचे श्री गंगाधरेश्वर मंदिर
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गाव प्रवरा नदीकाठी वसलेले आहे. या ठिकाणी एकेकाळी अगस्ती ऋषींचा आश्रम होता. सध्या या ऋषींचे मंदिर गावात आहे. पण आम्हाला सिद्धेश्वर आणि गंगाधरेश्वर मंदिरे पाहायची होती. जिना असलेले प्रवेशद्वार अकोले गावामधून गावठान-सिन्नर रस्त्याने जाताना उजव्या बाजूला मॉडर्न आणि ज्ञानवर्धिनी शाळेच्या बाजूने एका छोट्या गल्लीमध्ये एका उंच दगडी जोत्यावर हे मंदिर बांधले असेल असा अंदाजही येत नाही. हे एक खाजगी मंदिर आहे. मंदिराच्या आवारात प्रवेश करायला दोन प्रवेशद्वार आहेत. एक जिन्याने चढून येणाऱ्या दरवाजाने आणि दुसरा मागच्या बाजूच्या दरवाजाने.आम्ही गेलो तेव्हा जिन्याचा दरवाजा कुलूप लावून बंद केला होता मग थोडे पुढे मंदिराला वळसा घालून दुसऱ्या दरवाजासमोर उभे ठाकलो. सध्या हे प्रवेशद्वार वापरात आहे. . येथून जिन्याने मंदिरात प्रवेश दुसरे प्रवेशद्वार दरवाजावर लिहिले होते श्री.पोतनीस(संत) यांचे खाजगी मंदिर- सर्वाना मुक्त प्रवेश.मंदिरच्या परिसरात काही जुने वाडे आहेत. जुना वाडा या मंदिराची देखभाल श्री.धर्मधिकारी करतात, त्यांचे घर...
